अवयवदानामुळे तिघांना जीवदान

अवयवदानामुळे तिघांना जीवदान

Published on

अवयवदानामुळे तिघांना जीवदान
मुंबई, ता. १: एका ६३ वर्षीय महिलेने केलेल्या अवयवदानामुळे तिघांना जीवनदान मिळाले आहे. यामुळे मुंबईतील यंदाच्या अवयवदानांची संख्या २७ वर पोहोचली आहे. ही घटना ३० जून २०२५ रोजी अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात घडली. संबंधित महिलेची प्रकृती गंभीर झाल्यानंतर डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले; मात्र सुधारणा न झाल्याने त्यांना मेंदूमृत घोषित करण्यात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. महिलेचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड गरजूंना देण्याकरता प्रत्यारोपणासाठी पाठवण्यात आले. हे अवयवदान झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी (ZTCC) मुंबईच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com