हॉटेल मॅनेजमेंट, एमटेक, एमसीएची प्रवेश प्रक्रिया सुरू
पदव्युत्तर पदवीची प्रवेश प्रक्रिया सुरू
अभियांत्रिकी, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंटसाठी ९ जुलैपर्यंत मुदत
मुंबई, ता. १ : तंत्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत विविध पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. एमई, एम.टेक., एमबीए, एमसीए तसेच हॉटेल मॅनेजमेंट आदी अभ्यासक्रमांसाठी १ ते ९ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.
राज्य सीईटी कक्षाकडून राबविण्यात येत असलेल्या या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मंगळवारपासून (ता. १) सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमधूनच संबंधित अभ्यासक्रमांना प्रवेश करण्यासाठी अर्ज करता येतील. त्यानंतर २ ते १० जुलैदरम्यान कागदपत्रे ऑनलाइन पडताळणी किंवा प्रत्यक्ष पडताळणी करता येणार आहे. तसेच ९ जुलैनंतर अर्ज नोंदणी करणाऱ्या किंवा १० जुलैनंतर कागदपत्रांची पडताळणी करणारे विद्यार्थी नियमित फेरीसाठी पात्र ठरणार नाहीत, असेही सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
--
१३ जुलैला प्राथमिक गुणवत्ता यादी
विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्यातून पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची १३ जुलै रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. प्राथमिक गुणवत्ता यादीवर १४ ते १६ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना हरकती नोंदविता येणार आहेत. त्यानंतर १८ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.