शालेय बसचालकांचा संप पुढे

शालेय बसचालकांचा संप पुढे

Published on

मालवाहतूकदारांचा आजपासून संप
शालेय बसमालक संघटनेचा बंद मात्र पुढे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : ई-चालानसह विविध अन्यायकारक कारवायांच्या विरोधात मालवाहतूकदारांचा आजपासून बेमुदत संप सुरू होत आहे. महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर्स बस वाहतूक संघाच्या नेतृत्वाखाली राज्यातील ३० संघटना या संपात सहभागी होत आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी आज चर्चेसाठी निमंत्रित केल्याने शालेय स्कूल बसमालकांनी मात्र संप पुढे ढकलला आहे. दरम्यान खासगी बसमालकांनी मात्र २ जुलैऐवजी ७ जुलैपासून संप पुकारला आहे.
माल वाहतूकदारांकडून वसूल करण्यात येणारा ऑनलाईन दंड, दंडाची रक्कम कमी करणे, थकीत दंड माफ करणे, क्लिनरची सक्ती रद्द करणे, व्यावसायिक वाहनांची प्रवेश वेळेचा पुनर्विचार करणे, वाहनतळाची व्यवस्था करणे या सहा प्रमुख मागण्यांसह प्रलंबित मागण्यांसाठी २ जुलैपासून संपाची हाक दिली होती. विविध प्रकारचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर लादण्यात आल्याने मालवाहतूकदारांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. याशिवाय विविध कारणास्तव दररोज एक-दोन ई-चालान केले जात असल्याने मालवाहतूकदार मेटाकुटीस आले आहेत. त्याविरोधात १ जुलैच्या मध्यरात्रीपासून राज्यातील सर्व मालवाहतूकदार संपावर जात असल्याचे संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले. दरम्यान, या संपामुळे जेएनपीएतील ३८ हजार ट्रेलरची चाके थांबणार आहेत.
---
शालेय बसमालकांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
वाहतूक पोलिसांकडून बसचालकांवर होणारी अकारण कारवाईच्या विरोधात तसेच परवानग्यांसाठी होणाऱ्या अडवणुकीविरोधात ‘स्कूल बस ओनर्स असोसिएश’ने २ जुलैपासून बेमुदत संपाची हाक दिली होती; परंतु मुख्यमंत्र्यांकडून असोशिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. याप्रकरणी लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आल्याने संप पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
---
खासगी बसमालकांचा संप ७ जुलैपासून
आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही संप पुढे ढकलला आहे; परंतु २ जुलैपासून आम्ही गाडीला काळे झेंडे लावून निषेध व्यक्त करणार आहोत. आषाढी एकादशीनंतर म्हणजे ७ जुलैपासून संप केला जाणार असल्याचे मुंबई बस मालक संघटनेचे सचिव हर्ष कोटक यांनी सांगितले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com