मुंबईत मलेरिया आणि गॅस्ट्रोचा फैलाव

मुंबईत मलेरिया आणि गॅस्ट्रोचा फैलाव

Published on

मुंबईत मलेरिया आणि गॅस्ट्रोचा फैलाव
दररोज २९ जणांना मलेरिया; ३१ जणांना गॅस्ट्रोचा त्रास

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मुंबईत मलेरिया आणि गॅस्ट्रो (पाेटांचे आजार) हे आजार वाढत आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनूसार जून महिन्यात दररोज सरासरी २९ जणांना मलेरिया तर ३१ जणांना गॅस्ट्रोचा त्रास होत होता.
मलेरिया रोग पसरवणाऱ्या अ‍ॅनोफिलीस डासांमुळे मुंबईकरांना पोटाच्या समस्यांना तसेत इतर आजारांना तोंड द्यावे लागत आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी संक्रमित लोकांची संख्या ८८४ असून वरील आकडेवारीनुसार, या वर्षी जूनमध्ये मलेरियाच्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. यावर्षी गॅस्ट्रोबाधितांची संख्या ९३६ वर पोहोचली आहे.
हिंदुजा रुग्णालयातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे सल्लागार डॉ. पवन ढोबळे यांनी सांगितले, की पावसाळा येताच गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ होते. जून महिन्यात गॅस्ट्रोचे सुमारे ४० रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी काही रुग्णांना फक्त हायड्रेशनमुळे आराम मिळतो, तर गंभीर प्रकरणांमध्ये डॉक्सीसायक्लिनसारख्या अँटिबायोटिक्सची आवश्यकता असते. ते पुढे म्हणाले, की पावसाळ्यात दूषित पाणी आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या अस्वच्छ अन्नामुळे संसर्ग पसरतो. लक्षणे दिसल्यानंतर पालिकेचे दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये त्वरित चाचणी आणि उपचार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मलेरिया रोखण्यासाठी उपाययोजना
पालिकेच्या कीटकनाशक विभागाने मुंबईतील विविध भागांत एकूण ७२,७९५ डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणांची तपासणी केली आहे. त्यापैकी ६,५०६ ठिकाणी मलेरियाच्या डासांची उत्पत्ती आढळून आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com