राज्यात २४ तासांत १६ नवे कोरोना रुग्ण; मृत्यूची नोंद नाही

राज्यात २४ तासांत १६ नवे कोरोना रुग्ण; मृत्यूची नोंद नाही

Published on

राज्यात १६ नवे कोरोना रुग्ण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : राज्यात १ जुलै रोजी कोविडचे १६ नवीन रुग्ण आढळले असून, दिवसभरात एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. जानेवारीपासून आतापर्यंत एकूण ३०,५५७ चाचण्या करण्यात आल्या असून, २,५१७ रुग्ण बाधित आढळले आहेत. यापैकी २,३८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, सध्या ९० रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील बरे होण्याचे प्रमाण ९४.९१ टक्के इतके आहे. आढळलेल्या १६ नव्या रुग्णांमध्ये मुंबई ३, ठाणे १, पनवेल १, पुणे ४, नागपूर ३, चंद्रपूर ४ असा समावेश आहे. दरम्यान, सर्व निदान झालेले रुग्ण सौम्य स्वरूपाचे असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com