भोंग्याविरुद्ध पोलिसांची कारवाई हेतूपूर्वक

भोंग्याविरुद्ध पोलिसांची कारवाई हेतूपूर्वक

Published on

भोंग्याविरुद्ध पोलिसांची कारवाई हेतूपूर्वक
पाच दर्ग्यांची न्यायालयात धाव; भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ ः धार्मिक स्थळांवरील भोंग्याच्या वापराविरुद्ध मुंबई पोलिसांनी सुरू केलेली कारवाई ही मशिद-दर्ग्यांवरच करण्यात येत आहे. ही कारवाई विशिष्ट समुदायाला निवडकपणे लक्ष्य करण्यासारखे असल्याचा आरोप करून पाच दर्ग्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी न्यायालयाने पोलिसांसह राज्य सरकारला नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
न्यायालयाच्या आदेशावरून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या धार्मिकस्थळांवरील भोंग्याच्या वापराविरुद्ध मुंबई पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. तथापि मुंबई पोलिसांकडून मशिदी आणि दर्ग्यांना निवडकपणे लक्ष्य केले जात असल्यामुळे उपासकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा पाच दर्ग्यांनी केलेल्या याचिकेत केला आहे. पोलिसांनी याचिकाकर्त्या दर्ग्यांना ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नोटीस बजावली होती. या नोटिशीला याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच, पोलिसांची ही संपूर्ण कारवाई मुस्लिम समुदायाविरुद्ध असून ती शत्रुत्वपूर्ण भेदभाव करणारी आणि त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारी असल्याचा आरोप केला आहे. न्या. रवींद्र घुगे आणि न्या. मिलिंद साठये यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने पोलिसांना नोटीस बजावली व सुनावणी ९ जुलैपर्यंत तहकूब केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com