दोन्ही कान नसलेल्या विद्यार्थ्याला दिली ऐकण्याची क्षमता

दोन्ही कान नसलेल्या विद्यार्थ्याला दिली ऐकण्याची क्षमता

Published on

दोन्ही कान नसलेल्या विद्यार्थ्याला दिली ऐकण्याची क्षमता
केईएम रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिले नवजीवन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : जन्मजात दोन्ही कान नसल्याने ऐकू येत नसल्याची तक्रार घेऊन केईएम रुग्णालयात आलेल्या १३ वर्षीय मुलाला श्रवण क्षमता मिळवून देण्यात रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागातील डॉक्टरांना यश आले आहे. विशेष म्हणजे या मुलासाठी आर. एम. भट्ट हायस्कूल आणि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.
चैतन्य या मुलाला जन्मजात दोष निदान झाले होते. या मुलासाठी ‘गुरू दक्षिणा माझी विद्यार्थी संघ’ नावाच्या माजी विद्यार्थ्यांनी चैतन्यच्या उपचारासाठी ४.२ लाख रुपये जमा केले. त्‍याला ‘मायक्रोटिया’ नावाचा जन्मजात दोष होता.   ज्यामध्ये बाह्य (आणि कधीकधी आतील) कान विकसित होत नाहीत. १० हजार मुलांमध्ये एका मुलाला असा त्रास होतो.
चैतन्यवर २०१८ मध्ये महापालिका रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली होती, पण तीन वर्षांनंतर त्यात अडचण निर्माण झाली, असे चैतन्यची आई अश्विनी घुले यांनी सांगितले.
केईएम रुग्णालयाच्या ईएनटी विभागातील डॉक्टरांनी काही महिन्यापूर्वी आर. एम. भट्ट शाळेत शिबिर घेतले होते. त्या वेळी चैतन्य त्या शिबिरात होता. डॉक्टरांनी त्‍याला रुग्णालयात येऊन भेटण्यास सांगितले. त्‍यानंतर डॉक्टरांनी बोन-अँकर्ड श्रवणयंत्र (बाहा) हे उपकरण लागेल, असे सांगितले. या उपकरणाची किंमत चार लाख रुपये असल्‍याचेही डॉक्‍टरांनी सांगितले.
केईएमच्या कान-नाक-घसा प्रमुख डॉ. हेतल मारफतिया यांनी सांगितले की, मुलाला जुने यंत्र अद्ययावत करण्याची आवश्‍यकता होती. आता चैतन्य स्‍पष्‍ट ऐकू शकतो, असे डॉक्‍टरांनी सांगितले. आर एम भट्ट हायस्कूल, गुरू दक्षिणा माझी विद्यार्थी संघाच्या अध्यक्ष प्रतिमा जोशी, माजी विद्यार्थी संजय खानविलकर, हेमंत कदम, सुभाष पेडणेकर, वैभव शिंदे आणि अमित ढोलम यांनी चैतन्यसाठी पुढाकार घेतला.

जन्मजात दोष
‘मायक्रोटिया’ हा जन्मजात दोष आहे. गर्भधारणेदरम्यान बाह्य कान विकसित न झाल्‍यास हा आजार होतो. एक किंवा दोन्ही बाह्य कान सामान्यपेक्षा लहान किंवा नसू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com