महानगर गॅसचा बिलिंग साठी सोपा पर्याय

महानगर गॅसचा बिलिंग साठी सोपा पर्याय

Published on

महानगर गॅसचा  बिलिंग साठी सोपा पर्याय
व्हॉट्सॲपवरून ‘रीडिंग’  पाठवा 

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. २ :  महानगर गॅसने ग्राहकांशी होणारे आदानप्रदान अधिक सुरळीत करण्यासाठी स्मार्ट उपक्रम सुरू केला आहे. आता व्हॉट्सॲपमार्फत पीएनजी मीटर रीडिंग पाठवता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना बिलिंग साठी आणखी सोपा पर्याय मिळणार आहे. 
घरगुती ग्राहक एमजीएलच्या अधिकृत व्हॉट्सॲप खात्यावरून आलेल्या विनंतीला उत्तर देताना त्यांच्या पीएनजी मीटरचा फोटो पाठवू शकतात, ज्यामध्ये मीटर रीडिंग (८ अंकी) आणि मीटर क्रमांक दिसत असेल. यामुळे बिलिंगची प्रक्रिया वेळच्या वेळी आणि अचूक रीतीने होईल. व्हॉट्सॲपबरोबरच ग्राहक अनेक विविध डिजिटल आणि पारंपरिक माध्यमांतून त्यांचे मीटर रीडिंग पाठवत राहू शकतात. एमजीएल कनेक्ट ॲपवर मीटरचा फोटो अपलोड करून, ९२२३५५५५५७  या क्रमांकावर एसएमएस  करून, मीटर फोटो आणि रीडिंगसह support@mahanagargas.com येथे ईमेल पाठवून,  वेबसाईट www.mahanagargas.com येथे लॉगिन करून मीटर रीडिंग पाठवता येणार आहे.  ग्राहकांनी त्यांचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी त्यांच्या बीपी/सीए क्रमांकावर नोंदवून घ्यावेत. यासाठी ग्राहकसेवेला (०२२) ६८६७ ४५००/(०२२) ६१५६ ४५०० येथे कॉल करावा, असे आवाहन महानगर गॅसने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com