पेंग्विनच्या देखभालीवर महिन्याला ५० लाख खर्च

पेंग्विनच्या देखभालीवर महिन्याला ५० लाख खर्च

Published on

पेंग्विनच्या देखभालीवर महिन्याला ५० लाख खर्च

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ ः वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील (राणीचा बाग) पेंग्विनच्या देखभालीवरील खर्चात दिवसेंदिवस वाढ होत असून, महिन्याला सुमारे ५० लाख रुपये खर्च केला जात आहे. माहितीच्या अधिकारात ही माहिती देण्यात आली आहे.
आरटीआय कार्यकर्ते गॉडफ्रे पिमेंटा यांनी माहितीच्या अधिकारात पेंग्विनच्या देखभालीसह राणीबागेतील साफसफाई, देखभाल, उद्यान देखभालीवर होणाऱ्या खर्चाची माहिती मागितली होती. त्यांना राणीबाग प्रशासनाने दिलेल्या उत्तरात कळवले आहे की, परदेशी आकर्षक पाहुणे असणाऱ्या पेंग्विनच्या देखभालीवर महिन्याला सुमारे ५० लाख, तर वर्षाला सहा कोटी रुपये खर्च केला जात आहे. गेल्या पाच वर्षांत पेंग्विनच्या देखभालीवर एकूण २५ कोटी ८३ लाख ४५ हजार ७३३ रुपये खर्च झाले आहेत. राणीबाग प्रशासनाने आपल्या उत्तरात असेही म्हटले आहे की, गेल्या पाच वर्षांत उद्यानाच्या साफसफाईवर २७ कोटी ११ लाख नऊ हजार एक रुपया खर्च झाला आहे. उद्यानाच्या देखभालीवर २१ कोटी ४३ लाख ८५ हजार ५२ रुपये खर्च केले असून, उद्यानाच्या देखभालीवर एकूण ३१ कोटी २० लाख ६५ हजार ८७३ रुपये खर्च झाले असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com