विद्यार्थ्याचे लैंगिण शोषण
करणारी शिक्षिका अटकेत

विद्यार्थ्याचे लैंगिण शोषण करणारी शिक्षिका अटकेत

Published on

वासनांध शिक्षिकेकडून
विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण
किंवा
अल्पवयीन विद्यार्थ्याचे
शिक्षिकेकडून लैंगिक शोषण
पालकांच्या तक्रारीनंतर पोलिस कोठडी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ ः एका अल्पवयीन विद्यार्थ्याचे सुमारे वर्षभर लैंगिक शोषण करणाऱ्या शाळेच्या शिक्षिकेला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. शिक्षिकेने विद्यार्थ्यास मद्यपान आणि नैराश्य घालविण्याच्या औषधांचीही सवय लावल्याचे तपासात उघड झाले आहे. संबंधित शाळा मध्य मुंबईतील नामांकित असून विविध क्षेत्रांतील वलयांकित व्यक्ती आणि त्यांच्या मुलांनी तिथे शिक्षण घेतल्याचे समजते.
गेल्या वर्षी शाळेतील एका समारंभावेळी ४० वर्षीय आरोपी शिक्षिका पीडित विद्यार्थ्याकडे आकर्षित झाली. सुरुवातीला शिक्षिकेकडून होणारी आक्षेपार्ह शारीरिक जवळीक विद्यार्थी टाळत आला; पण एका मैत्रिणीच्या माध्यमातून तिने त्याचे मन वळविले. नंतर आपल्या आलिशान कारमधून त्याला नेऊन त्याचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर तिने अनेकदा शहरातील विविध तारांकित हॉटेलमध्ये त्याच्याशी जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले. दरम्यान, शिक्षिका त्यास मद्यप्राशनाची सक्तीही करीत होती. महत्त्वाच्या शैक्षणिक वर्षात अचानक घडलेल्या अनाकलनीय घटनांमुळे पीडित विद्यार्थी नैराश्यात गेला. त्याचा गैरफायदा घेत शिक्षिकेने त्यास औषधी गोळ्याही दिल्या. संबंधित प्रकार उघडकीस येताच, पोलिसांनी पॉक्सोसह विविध कमलांनुसार गुन्हा नोंदवत शिक्षिकेला अटक केली. सध्या पोलिस कोठडीत तिची चौकशी सुरू असून, तिच्या मैत्रिणीला गुन्ह्यात सहआरोपी केल्याचे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंतच्या तपासातून असा प्रकार अन्य विद्यार्थ्यांसोबत घडल्याची माहिती पुढे आलेली नाही; मात्र त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
----
पालकांना कल्पना होती
मुलाच्या वागण्यात अचानक घडलेले बदल लक्षात येताच पालकांनी त्याबाबत चौकशी केली. त्यावेळी त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. दोन ते तीन महिन्यांत शिक्षण पूर्ण झाल्यावर मुलगा महाविद्यालयात शिकायला गेल्यावर शिक्षिका आपोआपच त्याची पाठ सोडेल, असा विचार पालकांनी केला. मात्र, महाविद्यालयात गेल्यावरही शिक्षिका त्याचा पिच्छा सोडत नसल्याचे लक्षात येताच पालकांनी पोलिसांत तक्रार केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com