भाषेवरून दुकानदारांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध
भाषेवरून दुकानदारांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध
व्यापाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ ः भाषेच्या नावाखाली दुकानदारांवर होणाऱ्या हल्ल्यांचा व्यापाऱ्यांकडून तीव्र निषेध व्यक्त होत असून, फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेंद्र शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना वीरेंद्र शहा यांनी सांंगितले की, अलीकडे सोशल मीडिया आणि बातम्यांमधून अनेक धक्कादायक व्हिडिओ समोर येत आहेत. भाषेच्या कारणावरून राजकीय पक्षांचे कार्यकर्ते दुकानदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करत आहेत. महाराष्ट्रात राहून व्यवसाय करताना मराठी भाषा शिकणे आणि बोलणे गरजेचे आहे. ही आपली संस्कृती आणि इथल्या भूमीचा आदर आहे, ही भूमिका आम्हाला ही मान्य आहे, पण याचा अर्थ असा अजिबात होत नाही की, दुकानदारांना मारहाण करण्याचा, अपमान करण्याचा, धमकावण्याचा कोणाला अधिकार आहे. कोणताही पक्ष किंवा व्यक्ती कायदा हातात घेऊ शकत नाही. केवळ दुकानदार एखादी विशिष्ट भाषा बोलत नाहीत म्हणून त्यांच्यावर हल्ले करणे हा सरळ कायद्याचा भंग आहे आणि अत्यंत निषेधार्ह आहे, असेही शहा म्हणाले. फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने आम्ही भाषेच्या नावाखाली दुकानदारांवर हल्ला करणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाचा तीव्र निषेध करतो. व्यापाऱ्यांवर हल्ले होत असताना पोलिस यंत्रणा गप्प आहेत याचे आश्चर्य वाटते, असेही त्यांनी म्हटले आहे.
...
या आहेत मागण्या....
- पोलिसांनी प्रकरणात तत्काळ स्वतःहून गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी
- महाराष्ट्रात अशा प्रकारचे राजकारण खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा द्यावा
- दुकानदार व कर्मचाऱ्यांचे रक्षण करावे
- न्याय, सुरक्षा आणि कायद्याची कडक अंमलबजावणी करावी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.