सरकारी योजनेतील रुग्णालये कधी वाढवणार?
सरकारी योजनेतील रुग्णालये कधी वाढवणार?
भातखळकरांचा विधानसभेत प्रश्न
मुंबई, ता. ३ ः सर्वसामान्यांसाठी आवश्यक अशा महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांच्यातील रुग्णालयांची संख्या कधी वाढवणार, असा प्रश्न कांदिवली पूर्वेचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विधिमंडळात उपस्थित केला.
“मुंबई शहर व उपनगरात या दोन आरोग्य योजनांमध्ये अंतर्भूत रुग्णालयांची संख्या कमी आहे. रुग्णालये या योजनेत यायला टाळाटाळ करतात. त्याकरिता उपाययोजना करून रुग्णालयांना या योजनेत आणण्यासाठी सरकार गती देईल का,” असा प्रश्नही त्यांनी विचारला. “धर्मादाय रुग्णालयांमध्ये आरक्षित खाटांचा गरजू रुग्णांना १०० टक्के लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्रातल्या सर्व चॅरिटेबल रुग्णालयांचा ऑनलाइन डॅशबोर्ड लोकांकरिता उपलब्ध होईल का, यासाठी सॉफ्टवेअर तयार केले आणि रुग्णालयांना ते बसवणे सक्तीचे केले, तर त्यांच्याकडे किती खाटा रिकाम्या आहेत हे आपल्याला मंत्रालयात बसूनही कळू शकेल. त्यामुळे अशी योजना असेल, तर ती कधीपर्यंत अमलात आणणार?” असेही भातखळकर यांनी विचारले. याबाबत राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी सांगितले की, यासंदर्भात आधुनिक तंत्रज्ञान वापरून लोकांना ताजा तपशील मिळेल, असे प्रयत्न सुरू आहेत. याव्यतिरिक्त रुग्णालयात आरोग्यदूतही ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.