''सहकार भक्ती रथ'' ई बस
‘सहकार भक्तीरथ’ ई-बसचे अनावरण
मुंबई, ता. ३ : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरात वाहनांना बंदी असल्यामुळे राज्य सहकारी बँकेने भक्तांसाठी सेवाभावी तत्त्वावर ई-बस सेवा दिली असून, त्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (ता. ५ जुलै) हाेणार आहे.
मंदिराच्या आसपास वाहनांना बंदी असल्यामुळे वृद्ध, दिव्यांग, गरोदर महिलांचे हाल होतात. त्यामुळे भक्तांसाठी ई-बस देण्याची विनंती मंदिर समितीने राज्य सहकारी बँकेला केली होती. समाजकार्याच्या भावनेतून राज्य सहकारी बँकेने मंदिर समितीची ही विनंती मान्य केली आहे, असे प्रशासक विद्याधार अनास्कर यांनी सांगितले. सदर बस वातानुकूलित असून, त्यात १४ ते १६ आसन व्यवस्था, टीव्ही आणि आधुनिक यंत्रणा आहेत. त्याद्वारे भक्तांना विठ्ठलाच्या पूजेचे दर्शन घेता येईल. या बसचे नामकरण सहकार भक्तीरथ असे होणार असून, अनावरण मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते हाेणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.