आधार-अपार जोडल्याने शिक्षण प्रवास नोंदणार
आधार-अपार जोडल्याने शिक्षण प्रवास नोंदणार
दादा भुसे यांची विधान परिषदेत माहिती
मुंबई, ता. ३ : राज्यातील शासकीय, अनुदानित आदी शाळांतील प्रत्येक विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रवास ट्रॅक केला जाणार आहे. आधार लिंकिंग आणि अपार आयडी (विद्यार्थ्यांसाठी युनिक कोड) यामार्फत हा प्रवास ट्रॅक केला जाणार असून, यातील सध्या राज्यात ८६ टक्के विद्यार्थ्यांचा डेटा संकलित झालेला असून, ९५ टक्के विद्यार्थ्यांचे आधार लिंकिंग पूर्ण झाले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधान परिषदेत नियम ९२ अन्वये अर्धातास चर्चेला उत्तरात दिली. तसेच शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी १ ते १५ जुलैदरम्यान विशेष मोहीम राबवली जात असल्याचीही माहिती त्यांनी या वेळी दिली.
१५ जुलैपर्यंत होणाऱ्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणातून सापडलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाईल, यासाठीचे सर्व प्रयत्न केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी आपल्या उत्तरात दिली. तसेच राज्यातील शासकीय, अनुदानित शाळांमध्ये घटलेल्या पटसंख्येवर चिंता व्यक्त केली. शासन विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या, शाळाबाह्य विद्यार्थी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात गंभीर असून, सर्वंकष उपाययोजना राबवत आहे. यू-डायस प्रणालीच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांची संख्या काहीशी घसरलेली असली तरी त्यामागील कारणे समजून घेऊन योग्य ती कार्यवाही केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्यातील अनेक विद्यार्थी दहावीनंतर आयटीआय, डिप्लोमा आदी अभ्यासक्रमांकडे वळतात, मात्र त्यांच्या शाळेतील रेकॉर्ड अद्ययावत होत नसल्यामुळे ते ‘ड्रॉपआऊट’ म्हणून नोंदविले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. कमी पटसंख्येची कोणतीही शाळा बंद होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
...
शिक्षकांची गुणवत्ता वाढविण्यावर भर
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये अत्यंत दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यासाठी शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे. आतापर्यंत नऊ हजार उच्चशिक्षित शिक्षक नियुक्त झाले असून, आणखी १० हजार भरती प्रक्रियेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.