फिल्मिस्तान स्टुडिओ हाेणार इतिहासजमा

फिल्मिस्तान स्टुडिओ हाेणार इतिहासजमा

Published on

फिल्मिस्तान स्टुडिओ हाेणार इतिहासजमा
मुंबई, ता. ३ : गोरेगाव पश्चिमेच्या जुन्या फिल्मिस्तान स्टुडिओची चार एकर जागा आर्किट डेव्हलपरने १८३ कोटींना विकत घेतली आहे. यातून त्यांना तीन हजार कोटी रुपयांचे विकासमूल्य मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आता चेंबूरच्या ऐतिहासिक आर. के. स्टुडिओनंतर फिल्मिस्तान स्टुडिओदेखील इतिहासजमा होणार आहे.
गोरेगाव रेल्वेस्थानकाच्या जवळ स्वामी विवेकानंद रोडवर ही जागा असून, येथे आर्केड डेव्हलपर्सतर्फे तीन, चार आणि पाच बीएचकेची आलिशान निवासी घरे उभारली जातील. येथे ५० मजल्यांचे दोन टॉवर उभारले जातील. या ठिकाणापासून बाजारपेठेसह पश्चिम द्रुतगती महामार्ग, मेट्रो रेल्वे, लिंकिंग रोड जवळ असून, हा परिसर वेगाने विकसित होत आहे. रुग्णालये, शॉपिंग मॉल, शाळा, कॉलेज, करमणुकीची केंद्रेदेखील याच परिसराच्या आसपास आहेत, असे आर्केडचे अध्यक्ष अमित जैन म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com