कॅबचे दुप्पट भाडे चुकीचे

कॅबचे दुप्पट भाडे चुकीचे

Published on

कॅबचे दुप्पट भाडे चुकीचे
केंद्राच्या निर्णयावर वाहतूकतज्ज्ञांची नाराजी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : केंद्र सरकारने ओला, उबर, रॅपिडोसारख्या ॲपआधारित टॅक्सी/कॅब पुरवठादारांना गर्दीच्या वेळी दुप्पट भाडे आकारण्याची दिलेली परवानगी चुकीची असल्याबाबत वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली.
रस्ते वाहतूक मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या नियमानुसार, ॲपआधारित प्रवासी सेवा कंपन्यांना गर्दीच्या वेळी मूळ भाड्याच्या दुप्पट भाडे आकारण्याची परवानगी असेल. त्याशिवाय गर्दी नसलेल्या वेळेत कॅब सेवांचे भाडे मूळ भाड्याच्या किमान ५० टक्के असेल. केंद्र सरकारच्या या नियमांमुळे प्रवाशांना कमी गर्दीच्या वेळी दिलासा मिळणार आहे. गर्दीवेळी मात्र भुर्दंड बसणार असल्याचे वाहतूकतज्ज्ञांनी म्हटले आहे. 
==
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे. रिक्षा, टॅक्सी वेळेत मिळत नाही. त्यात कॅब सेवा कंपन्यांना गर्दीच्या वेळी दुप्पट भाडे आकारण्याची परवानगी दिल्याने प्रवाशांचे हाल होणार आहे.
- विद्याधर दाते, वाहतूकतज्ज्ञ 
==
रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास केल्यास दिवसाचे भाडे आणि रात्रीचे भाडे निश्चित केलेले आहे.  त्याप्रमाणे कॅबसाठीही किमान भाडे निश्चित करण्याची गरज आहे. दुप्पट भाडे कोणत्या आधारे आकारणार हा प्रश्न आहे.  
- ए. व्ही. शेणॉय, वाहतूकतज्ज्ञ 
====
भाडेवाढ झाल्यास प्रवासी चालकांना दोष देतात. या सर्वांचा फटका चालक आणि प्रवाशांना बसणार असून, कंपन्या मात्र नफा कमावणार आहेत.
- रिझवान शेख, अध्यक्ष अ‍ॅपआधारित वाहतूक युनिट, राष्ट्रीय कामगार संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com