पहिली-दुसरीच्या वेळापत्रकातून हिंदीला वगळले

पहिली-दुसरीच्या वेळापत्रकातून हिंदीला वगळले

Published on

पहिली, दुसरीच्या वेळापत्रकातून हिंदीला वगळले
सुधारित वेळापत्रक जाहीर, पर्याय म्हणून कौशल्य विषयाची शक्यता
मुंबई, ता. ३ : हिंदी विषयासंदर्भातील दोन शासन निर्णय रद्द केल्यानंतर पहिली आणि दुसरीच्या वर्गासाठी १९ जून रोजी जाहीर करण्यात आलेले शालेय कामकाज, विषयनिहाय तासिकांच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. सुधारित वेळापत्रक आज राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) जाहीर केले. यात तिसरी भाषा म्हणून हिंदीसाठी दिलेला वेळ विविध कौशल्य विषयांसाठी दिला जाण्याची शक्यता आहे.
एससीईआरटीने नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता पहिली व दुसरीच्या विषय योजना, शालेय कामाचे दिवस, विषयनिहाय तासिका विभागणी यासंदर्भातील शालेय वेळापत्रक १९ जून रोजी वेळपत्रक जाहीर केले होते. त्यात मराठी, इंग्रजी या दोन भाषांच्या वेळांमध्ये हिंदी अथवा इतर विषयासाठी वेळ देण्यात आला होता. त्यात आता बदल करण्यात आला आहे. त्या ठिकाणी स्थानिक कौशल्य, सैनिकी शिक्षण, जीवनकौशल्य, स्थानिक परिसर ओळख, आत्मनिर्भर होण्यासाठी स्वत:ची कामे करण्याचा विषय इत्यादींचा समावेश केला जाण्याची शक्यता ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व राज्य अभ्यासक्रम आराखड्याचे सदस्य महेंद्र गणपुले यांनी व्यक्त केली. तसेच हिंदीच्या पर्यायी विषयासाठी आम्ही एससीईआरटीला २० विषयांची नमुना यादी आणि त्याचे मुद्दे दिले आहेत. यामुळे हिंदी अथवा इतर कौशल्यासाठी गुणांकन इत्यादीसाठीचा विषयही यातून सुटण्यास मदत होईल, अशीही शक्यता त्यांनी व्यक्त केली. हे वेळापत्रक तूर्तास पहिलीच्या वर्गासाठी लागू होणार असून, दुसरीच्या वर्गाला नवीन शैक्षणिक धोरणाची पुस्तके लागू झाल्यास ते लागू होणार असल्याचेही विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com