सेंट जॉर्जला यकृत प्रत्यारोपणासाठी परवानगी
आता सेंट जॉर्जमध्येही यकृत प्रत्यारोपण
आरोग्य विभागाची परवानगी; गरजू रुग्णांना दिलासा
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : राज्य सरकारच्या सेंट जॉर्ज रुग्णालयाला अखेर यकृत प्रत्यारोपण करण्यासाठी आरोग्य विभागाकडून अधिकृत परवानगी मिळाली आहे. मागील १० महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ही परवानगी मिळाल्याने गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सेंट जॉर्ज रुग्णालयाने ऑगस्ट २०२४ मध्ये यकृत प्रत्यारोपण परवानगीसाठी अर्ज केला होता. मात्र या प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक व वैद्यकीय सोयी-सुविधा उभारणे हे मोठे आव्हान होते. अखेर रुग्णालयाने निकष पूर्ण केल्यानंतर आरोग्य विभागाने अधिकृत परवानगी दिली. सरकारी रुग्णालय असल्याने येथे प्रत्यारोपणाचा खर्च फार कमी लागणार आहे. खासगी रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणासाठी २० ते २५ लाख रुपये मोजावे लागतात, तर सेंट जॉर्ज रुग्णालयात हा खर्च सुमारे पाच लाख रुपयांपर्यंत मर्यादित राहील. याशिवाय शासनाच्या विविध आरोग्य योजनांमधून व दात्यांच्या माध्यमातून रुग्णांचा आर्थिक बोजा आणखी हलका होणार आहे.
...
चार खाटांचा विशेष कक्ष
रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, अद्ययावत यकृत प्रत्यारोपण केंद्रात चार खाटांचा विशेष अतिदक्षता कक्ष उभारण्यात आला आहे. त्यातील दोन खाटा रुग्णांसाठी, तर दोन खाटा अवयवदात्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. लवकरच यकृताशी संबंधित ओपीडी सेवादेखील सुरू करण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
....
अनुभवी डॉक्टरांची मदत
शस्त्रक्रिया करण्यासाठी खासगी रुग्णालयातील अनुभवी डॉक्टर्सची मदत घेतली जात आहे. ओपीडीसाठी गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टची नियुक्ती करण्यात आली आहे. ही सुविधा सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवांना नवी दिशा देणारी ठरणार असून, गरजू रुग्णांसाठी ती जीवनदायिनी ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.