सिटी स्कॅन, एमआरआय मशिन्ससाठी तातडीने निधी द्या ः नार्वेकर
सीटी स्कॅन, एमआरआय मशिन्ससाठी तातडीने निधी द्या ः नार्वेकर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मुंबईतील या सेंट जॉर्ज, जीटी, कामा आणि जे. जे. रुग्णालयात राज्यभरातून रुग्ण येत येतात; पण या रुग्णालयात सीटी स्कॅन आणि एमआरआय मशिन्सची कमतरता आहे. दोन महिन्यांपासून मी या मशिन्ससाठी पाठपुरावा करीत आहे; पण आवश्यक मशिन्स देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, असे आदेश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिले.
वैद्यकीय शिक्षण विभागातील गैरव्यवहाराबाबत शिवसेना आमदार संजय पोतनीस यांनी प्रश्न उपस्थित केला होता. सर्वसामान्य रुग्णांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांच्या नावाखाली बाजारभावापेक्षा अधिक दराने आवश्यक्ता नसताना वैद्यकीय उपकरणांची खरेदी होते. त्यामुळे शासकीय निधीचा अपव्यय होत असल्याने संजय पोतनीस यांनी सरकारच्या निदर्शनास आणले. यावरील चर्चेत भाग घेताना आमदार अमित देशमुख यांनी लातूरमधील जिल्हा वैद्यकीय महाविद्यालातील एमआरआय आणि सीटी स्कॅन मशिन्सच्या कमतरतेकडे लक्ष वेधले. यावरील चर्चेत भाग घेताना शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी मुंबईतील केईएम, सायन व नायर रुग्णालातही एमआरआय सीटी स्कॅन आणि लॅबचे साहित्य नाही. या सर्वांच्या खरेदीचे आदेश शासनाने दिले होते; पण खरेदी झाली नाही. ही खरेदी कधी होणार, असा सवाल केला.
...
राहुल नार्वेकर यांचा पाठपुरावा
या चर्चेनंतर शासनाला निर्देश देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, एमआरआय आणि सीटी स्कॅन मशिन्ससंदर्भात माझ्या दालनात गेल्या दोन महिन्यांत तीन बैठका झाल्या, पण मुंबईतील शासकीय रुग्णालयात या मशिन्स आलेल्या नाहीत.‘जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन आणि एमआरआय मशिन्स घेण्यासाठी निधी राखून ठेवावा. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ही मशिन्स घेण्यासाठी गरज पडल्यास अधिकचा निधी उपलब्ध करून द्यावा,’ असे आदेश राहुल नार्वेकर यांनी दिले. त्यावर या मशिन्सच्या खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.