आमदार निधी गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल
आमदार निधी गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई, ता. ३ : भाजपचे विधानपरिषद सदस्य आणि पदाधिकारी प्रसाद लाड यांचा कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून आवाज काढत जिल्हा नियोजन कार्यालयातील अधिकाऱ्यांना बनावट हमी पत्राद्वारे ३.६० लाखांचा निधी रत्नागिरीहून बीड जिल्ह्यात वर्ग करण्याचा भामट्यांचा डाव फसला. या प्रकरणी मुंबईतील शीव पोलीस ठाण्यात प्रशांत लाडे, सचिन बनकर, निलेश वाघमोडे आणि लाड यांचा हुबेहूब आवाज काढणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात मंगळवारी (ता. २) मध्यरात्री गुन्हा नोंदवला. त्याबाबतची माहिती लाड यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान उघड केली.
मुंबईच्या जिल्हा नियोजन कार्यालयातील सतर्क अधिकाऱ्यांनी लाड यांच्या पाच कोटींच्या निधीपैकी ३.६० कोटी रुपये रत्नागिरीहून वर्ग करण्याचे हमीपत्र तयार झाले होते. ही बाब या अधिकाऱ्यांनी लाड यांच्या कानी घातली. त्यांनंतर झालेल्या चौकशीत रत्नागिरी येथील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष लाड यांनीच तसे आदेश अमुक एका मोबाईल क्रमांकावरून दिले होते, अशी माहिती पुढे आली; मात्र असा कोणताही फोन केला नसल्याचे लाड यांच्या लक्षात असल्याने त्यांनी हे हमीपत्र आणि निधीबाबतचे अन्य पत्र तपासणीसाठी मागवले.
भाजपचे उपाध्यक्ष असताना २०२१ पर्यंत हे लेटर हेड लाड वापरत होते. सध्या त्यांचे लेटर हेड वेगळे आहे. गुन्ह्यात वापरलेल्या पत्रात लाड यांचे अन्य तपशीलही चुकीचे आढळले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.