टाटा पॉवरची ७५२ मेगावॉटची वीजनिर्मिती
टाटा पॉवरची ७५२ मेगावॉटची वीजनिर्मिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडने गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्रासह देशभरात तब्बल ७५२ मेगावॉट क्षमतेचे अपारंपरिक म्हणजे सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प उभारून त्यामधून वीजनिर्मिती सुरू केली आहे. मागील वर्षी एप्रिल ते जून या तीन महिन्यांत कार्यान्वित केलेल्या वीज प्रकल्पांच्या तुलनेत चालू वर्षी एप्रिल-जून या तिमाहीत ११२ टक्के अधिक क्षमतेच्या प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरू केली आहे.
विजेची वाढती मागणी पूर्ण करण्याबरोबरच सौर आणि पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याला चालना दिली जात आहे. त्यानुसार टाटा पॉवर वीजनिर्मिती करीत आहे. त्यामुळे एकूण हरित वीज निर्मिती क्षमता आता ५,६०० मेगावॉटवर पोहोचली आहे. त्यामध्ये ४,६०० मेगावॉट सौर आणि १,००० मेगावॉटचे पवन ऊर्जा प्रकल्प आहेत.
दरम्यान, कंपनीचे चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत १,७०० मेगावॉटचे स्वतःचे तर एक हजार मेगावॉटचे थर्ड पार्टी प्रकल्प कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. कंपनीचे ऊर्जा प्रकल्प केवळ देशाच्या स्वच्छ ऊर्जा क्षमतेमध्ये योगदान देतात असे नाही, तर ऊर्जा सुरक्षेसाठी व शाश्वत विकास उद्दिष्टांना पाठबळ देणाऱ्या धोरणात्मक भूमिका बळकट करण्यास मदत करीत असल्याचे टाटा पॉवरने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.