स्तन शुश्रूषेसाठी ‘ए-आय’चा वापर

स्तन शुश्रूषेसाठी ‘ए-आय’चा वापर

Published on

स्तन शुश्रूषेसाठी ‘एआय’चा वापर
पालिका केईएम रुग्णालयात सेवा; समर्पित वॉर्डचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. ४ : पालिकेच्या केईएम रुग्णालयात स्तन शुश्रूषेसाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय वापरले जात असल्याचे शस्त्रक्रिया विभागाच्या प्राध्यापक आणि ब्रेस्ट सर्व्हिसच्या प्रमुख डॉ. शिल्पा राव यांनी सांगितले. यासाठीच्या समर्पित वॉर्डचे मंगळवारी (ता. १) उद्‍घाटन करण्यात आले असून वर्षभरात हजार रुग्णांचे तर दिवसाला २० रुग्णांचे स्क्रिनिंग करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या समर्पित वॉर्डची मागणी गेल्या पंधरा वर्षांपासून करण्यात येत होती.
केईएम रुग्णालयात २०१० सालापासून आतापर्यंत एकूण १५ हजार वेगवेगळे स्तनाशी निगडित असणाऱ्या रुग्णांना तपासले गेले. सद्यस्थितीत दर आठवड्याला ओपीडीमध्ये ६० ते ७० रुग्ण येतात. यापैकी जवळपास २० टक्के रुग्ण हे कर्करोगाचे असतात, अशी माहिती या वेळी देण्यात आली. यामध्ये थर्मलिटिक्स एआय ही मशीनचा वापर करून निष्कर्ष (एल्गोरिदम्स) काढले जातात. सध्या या मशीनच्या अहवालाच्या तसेच मॅमोग्राफी आणि सोनोग्राफी अहवालांच्या आधारे स्तनाच्या कर्करोगावर उपचार केले जातील. एका वर्षभरात अंदाजित सात हजार महिलांच्या चाचण्या, उपचार आणि गरजेनुसार शस्त्रक्रिया करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. वयाच्या तिशीतच महिलांना स्तनाशी निगडित समस्या आढळून येत आहेत; त्यामुळे त्यांनी या तिन्ही चाचण्या करणे आवश्यक आहे.

...
१५ खाटांचा विशेष वॉर्ड-
कर्करोगात रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते; त्यामुळे त्यांना इतर आजार बळावण्याची शक्यता जास्त असते. हेच टाळण्यासाठी १५ खाटांचा समर्पित विशेष वॉर्ड सुरू करण्यात आला आहे.  किमोथेरपीच्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, त्यामुळे हा वॉर्ड खूप महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे डॉ. राव यांनी सांगितले. या वॉर्डमध्ये मॉनिटर्स, स्टेट ऑफ दि आर्ट किमोथेरपी युनिट, समर्पित परिचारिका आहेत. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आणि सामान्य शस्त्रक्रिया विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षा कुलकर्णी, वैद्यकीय महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. नीलम अंद्राडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा वॉर्ड सुरू करण्यात आल्याचे डॉ. राव यांनी सांगितले.


अंदाजित ४० टक्के रुग्ण मुंबईबाहेरील
डॉ. शिल्पा राव यांच्या म्हणण्यानुसार, जवळपास ४० टक्के रुग्ण हे मुंबईबाहेरील आहेत. गुजरात, मध्य प्रदेश, कोलकाता येथून मोठ्या प्रमाणावर रुग्ण येतात. स्तन कर्करोगासाठी बहुउद्देशीय पथकाची गरज असते. प्लॅस्टिक, फिजिओथेरपी, कार्डिओऑन्कॉलॉजी या क्षेत्रातील तज्ज्ञ हवे असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com