चुनाभट्टी पोलिस ठाण्यात आरोपीचा धिंगाणा

चुनाभट्टी पोलिस ठाण्यात आरोपीचा धिंगाणा

Published on

चुनाभट्टी पोलिस ठाण्यात आरोपीचा धिंगाणा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः चोरीच्या गुन्ह्यात संशयावरून ताब्यात घेतलेला तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांनी चुनाभट्टी पोलिस ठाण्यात धिंगाणा घातला. या तरुणाने स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला, तर कुटुंबीयांनी आरडाओरडा करीत पोलिसांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. चुनाभट्टी पोलिसांनी या प्रकरणात अक्षय गायकवाड या तरुणासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
चुनाभट्टी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुनाभट्टीच्या लालडोंगर परिसरात एका घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी करण्यात आली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही पुराव्यांच्या आधारे या परिसरात अक्षय गायकवाड हा तरुण इतर साथीदारांच्या सोबत संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. या प्रकरणानंतर अक्षय बेपत्ता झाला होता. पोलिसांनी २ जुलै राेजी अक्षयला ताब्यात घेऊन अधिक चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले. हे समजताच अक्षयचे कुटुंब पोलिस ठाण्यात आले. अक्षयला अटक होण्याची शक्यता पाहून अक्षय आणि त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांमोरच धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. दरम्यान, अक्षयने ब्लेडने स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतला. त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांना धक्कबुक्की केली. भिंतीवर डोके आपटत असल्याचे पाहून आई, वडील आणि भावाने आरडाओरडा करीत पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. अखेर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या अक्षय आणि त्याच्या कुटुंबीयांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com