वाहनचालकांसाठी केंद्राची नियमावली

वाहनचालकांसाठी केंद्राची नियमावली

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : देशात १७६ उत्पादकांकडे संरक्षक हेल्मेटसाठी वैध बीआयएस परवाने आहेत, पण रस्त्याच्या कडेला विकल्या जाणाऱ्या अनेक हेल्मेटमध्ये अनिवार्य असलेले बीआयएस प्रमाणपत्र नसल्यामुळे भारत सरकारचा ग्राहक व्यवहार विभाग आणि भारतीय मानक ब्युरो (बीआयएस)तर्फे देशभरातील ग्राहकांना बीआयएस-प्रमाणित हेल्मेट वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय रस्त्यांवर २१ कोटींहून अधिक दुचाकी वाहने असल्याने, दुचाकीस्वारांची सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची आहे. मोटार वाहन कायदा, १९८८ अंतर्गत हेल्मेट घालणे अनिवार्य असले तरी, त्याचा प्रभावीपणा गुणवत्तेवर अवलंबून असतो. कमी दर्जाचे हेल्मेट संरक्षणाशी तडजोड करतात आणि त्यांचा मूळ उद्देश साध्य होत नाही. यावर उपाय म्हणून २०२१ पासून एक गुणवत्ता नियंत्रण आदेश लागू करण्यात आला आहे. याअंतर्गत सर्व दुचाकी चालकांसाठी बीआयएस मानकांनुसार प्रमाणित आणि चिन्हांकित हेल्मेट अनिवार्य कण्यात आले. याव्यतिरिक्त, विभागाने बीआयएस प्रमाणपत्राशिवाय हेल्मेटचे उत्पादन किंवा विक्री करण्याविरुद्ध कठोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे.
-------------------------
कारवाईचा दणका
गेल्या आर्थिक वर्षात बीआयएस मानक चिन्हाचा गैरवापर केल्याबद्दल ५०० हून अधिक हेल्मेट नमुने तपासण्यात आले. दिल्लीतील एका कारवाईत, कालबाह्य किंवा रद्द केलेले परवाने असलेल्या नऊ उत्पादकांकडून २५०० हून अधिक गैर-अनुपालन/ नियमबाह्य हेल्मेट जप्त करण्यात आले. १७ किरकोळ आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या ठिकाणी अशाच प्रकारच्या कारवाईमुळे ५०० निकृष्ट दर्जाचे हेल्मेट जप्त करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com