झोपडपट्टी पुनर्विकासाला शिवशाहीचा आधार

झोपडपट्टी पुनर्विकासाला शिवशाहीचा आधार

Published on

झोपडपट्टी पुनर्विकासाला शिवशाहीचा आधार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : झोपडपट्टी पुनर्विकास योजनांना आता शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचा आधार मिळणार आहे. पुनर्विकास प्रकल्प राबवताना सदर ठिकाणच्या रहिवाशांकरिता तात्पुरत्या स्वरूपात संक्रमण सदनिका नसल्याने प्रकल्प सुरू होण्यास विलंब लागतो. त्या पार्श्वभूमीवर शिवशाहीकडून संक्रमण सदनिका उभरल्या जाणार असून, त्यासाठी एसआरए प्राधिकरणाने भूखंड द्यावा, अशी मागणी केली आहे. सध्या शिवशाहीच्या मुंबई शहरासह उपनगरात ५६०० संक्रमण सदनिका असून, त्या एसआरए प्रकल्प राबवणाऱ्या विकसकांना भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. दरम्यान, मुंबईत अनेक झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प रखडलेल्या अवस्थेत आहेत. त्याची दखल घेत शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाने स्वखर्चाने नवीन संक्रमण सदनिका उभारण्याची तयारी केली आहे, मात्र त्यांच्याकडे भूखंड नसल्याने एसआरए प्राधिकरणाने द्यावा, असा प्रस्ताव शिवशाहीने दिला आहे. त्यानुसार भूखंड दिल्यास तत्काळ संक्रमण सदनिका उभारण्याचे काम हाती घेतले जाईल, अशी माहिती शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com