...अन्यथा पंधरा दिवसात विकासकांवर गुन्हे!
...अन्यथा पंधरा दिवसांत विकसकांवर गुन्हे!
म्हाडाकडे २३० कोटींची थकबाकी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : म्हाडाची मुंबई शहर आणि उपनगरांतील अनेक संक्रमण शिबिरे वर्षानुवर्षे विकसकांच्या ताब्यात आहेत. त्याचे जवळपास ३१ विकसकांनी २३० कोटी रुपयांचे भाडे थकीत आहे. त्याच्या वसुलीसाठी सध्या म्हाडाकडून सुनावणी सुरू आहे. त्यानंतरही संबंधित विकसकाने थकीत रक्कम न भरल्यास १५ दिवसांत गुन्हे दाखल केले जाणार आहेत. या थकीत रकमेत १४० कोटी रुपये मूळ भाडे आणि ९० कोटी रुपये व्याज आणि दंडाची रक्कम आहे.
मुंबई शहरातील अनेक उपकरप्राप्त इमारती धोकादायक झाल्याने किंवा कोसळल्याने तेथील रहिवाशांना म्हाडाने संक्रमण शिबिरात स्थलांतरित केले आहे. या मूळ रहिवाशांना महिन्याला ५०० रुपये तर घुसखोरांना तीन हजार रुपये भाडे आकारले जाते. तर उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास करणाऱ्या विकसकांना तेथील रहिवाशांना तात्पुरती सदनिका देता यावी म्हणून संक्रमण शिबिरातील अनेक सदनिका भाड्याने दिल्या आहेत. त्याला प्रति गाळा सहा-दहा हजार रुपये भाडे आकारले जाते. दरम्यान, जवळपास ३१ विकसकांनी गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून भाडे थकवले. विकसक भाडे भरत नसल्याने भाडे, दंड आणि व्याज अशी थकबाकी २३० कोटींच्या घरात गेली आहे.
...तरीही भाड्यातून सुटका नाही
थकीत भाड्याच्या वसुलीसाठी संबंधित विकसकांना म्हाडाने नोटीस पाठवल्या असून, सक्षम प्राधिकाऱ्यासमोर सुनावणी सुरू आहे. त्यानंतरही भाडे रक्कम न भरल्यास गुन्हे दाखल केले जाणार आहेत. दरम्यान, अनेक विकसकांनी आपल्या ताब्यात असलेल्या संक्रमण सदनिका म्हाडाला परत देण्याची तयारी दर्शविली आहे. तरीही त्यांना भाडे भरूनच यातून स्वतःची सुटका करून घेता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.