सुशील केडिया यांना उपरती

सुशील केडिया यांना उपरती

Published on

सुशील केडिया यांना उपरती 
राज ठाकरे यांची मागितली माफी 
सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. ५ ः केडिओनॉमिक्सचे संस्थापक आणि व्यावसायिक सुशील केडिया यांनी शुक्रवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना आव्हान देत मराठी शिकणार नसल्याची ‘एक्स’ पोस्ट केली होती; मात्र मनसे आणि शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर केडिया यांनी अखेर माफी मागितली आहे.
मराठी भाषेच्या मुद्द्यावरून अमराठी व्यावसायिकांना मनसेकडून झालेल्या मारहाणीनंतर व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांच्या मराठी भाषेच्या आग्रहाबाबत टीका केली होती. ‘राज ठाकरे, मी मागील ३० वर्षांपासून मुंबईत राहतो; पण मला मराठी व्यवस्थित येत नाही. आता तुमचे या संदर्भातील गैरवर्तन पाहता जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी माणसाचे कैवारी म्हणून वावरत आहात, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, काय करायचंय बोला’, अशी पोस्ट करीत केडियांनी टीका केली होती; परंतु त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांना आपल्या कृतीबाबत उपरती झाली आहे. अखेर त्यांनी ‘एक्स’ पोस्ट करीत राज यांची माफी मागितली आहे. ‘राज यांच्याबद्दल मला नेहमीच आदर आणि कृतज्ञता आहे. मी माझी चूक स्वीकारतो. तसेच मी आता अपेक्षा करतो की वातावरण शांत करावं, मी त्यांचा आभारी आहे’, असे केडिया यांनी म्हटले आहे.
==
मी केलेली पोस्ट तणावात लिहिली होती; पण माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. काही लोकांना वाद निर्माण करीत त्यामधून फायदा मिळवायचा होता; पण मराठी न कळणाऱ्या काही जणांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मी मानसिक तणावाखाली होतो. मला आता जाणवत आहे की मी माझी प्रतिक्रिया मागे घ्यायला हवी.
 - सुशील केडिया, व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com