स्वस्त घरांच्या प्रलोभनाने मोलकरणीने गमावले ४० लाख

स्वस्त घरांच्या प्रलोभनाने मोलकरणीने गमावले ४० लाख

Published on

स्वस्त घराच्या प्रलोभनापोटी गमावले ४० लाख
मोलकरणीसह अन्य व्यक्तींना दीड कोटींचा गंडा घालणाऱ्या महिलांविरोधात गुन्हा
मुंबई, ता. ५ ः कांजूरमार्ग येथील एमएमआरडीए वसाहतीतील घर आठ लाखांना मिळणार हे समजताच मालमत्ता विकून, दागिने गहाण ठेवून कर्ज काढून घरकाम करणाऱ्या महिलेने ४० लाख रुपये भामट्यांच्या हाती ठेवले. भामट्यांनी या महिलेसह भांडुप, कांजूरमार्ग येथे राहणाऱ्या अन्य काही व्यक्तींनाही अशाच प्रकारे फसवून तब्बल दीड कोटी रुपये लाटले. २०२३ मध्ये घडलेल्या या फसवणूक प्रकरणात भांडुप पोलिसांनी शुक्रवारी (ता. ४) नीता सराईकर आणि लक्ष्मी बंडे या दोन महिलांविरोधात गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.
तक्रारदार महिला आणि आरोपी बंडे भांडुप येथील सुभाषनगर परिसरातील एकाच इमारतीत राहतात. लक्ष्मीने कांजूरमार्ग येथे राहणाऱ्या सराईकर या साथीदार महिलेस एमएमआरडीएची अधिकारी असल्याचे भासवत कांजूर येथे प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेल्या वसाहतीतील अनेक घरे रिकामी असून सराईकर ती फक्त आठ लाखांना उपलब्ध करून देणार आहेत, असे प्रलोभन दाखवले.
त्यास भुलून तक्रारदार महिलेने विक्रोळी येथील घर विकले, स्वतःसह सुनेचे आणि मुलीचे दागिने गहाण ठेवले, मुलाने कर्ज काढले आणि एक नव्हे तर पाच घरांसाठी ४० लाख रुपये बंडे, सराईकर यांना दिले. पैसे दिल्यानंतरही घरांचा ताबा मिळत नसल्याने तक्रारदार महिलेने तगादा सुरू केला. तेव्हा आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. एका क्षणी आरोपींनी तक्रारदार महिलेस ३३ लाखांचा धनादेशही दिला; मात्र तो वठला नाही. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com