सहा वर्षात राणीच्या बागेत
२७५ प्राणी-पक्ष्यांचा मृत्यू

सहा वर्षात राणीच्या बागेत २७५ प्राणी-पक्ष्यांचा मृत्यू

Published on

सहा वर्षांत राणीच्या बागेत
२७५ प्राणी-पक्ष्यांचा मृत्यू
हत्ती व पोपटांचे प्रमाण सर्वाधिक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ ः भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात गेल्या सहा वर्षांत २७५ प्राण्यांचा मृत्यू झाल्याचे माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. त्यापैकी सन २०१९-२० मध्ये सर्वाधिक ७० प्राण्यांचा मृत्यू झाला. त्यातही सर्वाधिक मृत्यू हरीण आणि पोपटाचा झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले.
राणीबागेत विविध प्राणी व पक्षी मिळून साधारणतः ३३० प्राणी आहेत. हत्ती, वाघ, हरीण, मगर, पेंग्विन, अस्वल, तरस, विविध प्रकारचे पक्षी येथे पाहायला मिळतात. त्यातही शक्ती व करिष्मा हे दोन वाघ आणि पेंग्विन हे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. मागील सहा वर्षांत विविध कारणांमुळे राणीच्या बागेतील २७५ प्राणी व पक्ष्यांचा मृत्यू झाला, तर २८६ प्राणी आणि पक्ष्यांचा जन्म झाला. ऑस्ट्रेलियन पोपट आणि बगळा यांची संख्या सर्वाधिक वाढली आहे. तसेच दोन नर आणि एक मादी पेंग्विनचा जन्मही झाला आहे.
......
प्राणी-पक्ष्यांचा जन्म ही आनंदाची बाब असली तरी मृत्यूचा आकडा चिंता वाढवणारा आहे. मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे. प्रशासनाने मृत्यूदर कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
- गॉडफ्रे पिमेंटा, आरटीआय कार्यकर्ते
......
वर्ष जन्म मृत्यू
२०१९-२० ५६ ७०
२०२०-२१ १४ ५९
२०२१-२२ ४४ ५०
२०२२-२३ ६२ ४३
२०२३-२४ ३० २८
२०२४-२५ ५० २५
एकूण - २८६ २७५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com