अकरावीच्या साडेचार लाख विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश

अकरावीच्या साडेचार लाख विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश

Published on

अकरावीच्या साडेचार लाख विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश

मुंबई, ता. ५ ः अकरावीच्या प्रवेशाच्या कॅप फेरीच्या पहिल्या गुणवत्ता यादीत पसंती क्रमानुसार विविध शहरांतील महाविद्यालय अलॉट झालेल्या सहा लाख ३९ हजार १०१ विद्यार्थ्यांपैकी शनिवारी (ता. ५) रात्री उशिरापर्यंत कॅप फेरी प्रवेशात तीन लाख ७१ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले, तर शून्य फेरीतील कोटाअंतर्गत प्रवेश ७४ हजार ४३२ अशा एकूण चार लाख ४५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.
पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना सोमवारी (ता. ७) सायंकाळपर्यंत विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन आपले प्रवेश निश्चित करता येतील; मात्र सोमवारी मोहरम आणि इतर काही निमित्ताने कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी असल्यास त्यांना मंगळवारपर्यंत प्रवेश दिला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर शिक्षण संचालकांकडून पहिल्या फेरीमध्ये रिक्त राहिलेल्या जागांचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीचे नियोजन जाहीर केले जाणार आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमानुसार प्रवेश निश्चित झाले होते, त्यांना या दुसऱ्या फेरीत अर्ज करण्याची मुभा मिळणार नाही; मात्र ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज केला नाही, अशा विद्यार्थ्यांना मात्र या फेरीदरम्यान नव्याने नोंदणी करून आपला अर्ज दाखल करता येईल. पहिल्या गुणवत्ता यादीत चार लाख ५७ हजार ८४१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले होते.
दरम्यान, या पहिल्या गुणवत्ता यादीत मुंबई शहर आणि उपनगरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या एक लाख ९९ हजार २१० जागांपैकी ६४ हजार ८८७ विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशाच्या जागा अलॉट झाल्या होत्या, तर मुंबईतील नामांकित महाविद्यालयांची कला शाखेची कट ऑफ ९४ टक्केपर्यंत पोहोचली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com