मुंबईत पावसाचा जोर
मुंबईत पावसाचा जोर
उपनगरांना झोडपून काढले
मुंबई, ता. ५ : मुंबईत शनिवारी (ता. ५) पावसाचा जोर दिसला. दिवसभर पावसाने उपनगरांना चांगलेच झोडपून काढले. हवामान विभागाने रविवारी शहर आणि उपनगरांत वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.
मुंबईत आज पावसाने चांगली हजेरी लावली. काही भागांत मुसळधार, तर काही भागांत मध्यम पाऊस झाला. शहराच्या तुलनेत दोन्ही उपनगरांत मुसळधार पाऊस झाला. पश्चिम उपनगरात वांद्रे, बोरिवली, अंधेरी, दिंडोशी, गोरेगावमध्ये चांगला पाऊस झाला. पूर्व उपनगरात चेंबूर, घाटकोपर, कुर्ला, मुलुंड, देवनार भागालाही पावसाने झोडपून काढले, तर शहर भागात वरळी, दादर, सायन, नरिमन पॉइंट भागात जेमतेम पाऊस झाला. कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांसाठी वर्तवलेल्या अंदाजानुसार, शहर आणि उपनगरात काही ठिकाणी ताशी ४५-५५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३० अंश सेल्सिअस आणि २५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.