“द ग्रँड सीता चरित्रम” महाकाव्याने मुंबईकर मंत्रमुग्ध

“द ग्रँड सीता चरित्रम” महाकाव्याने मुंबईकर मंत्रमुग्ध

Published on

‘द ग्रँड सीता चरित्रम’ महाकाव्याने मुंबईकर मंत्रमुग्ध
अंबानी कल्चरल सेंटरमध्ये महाकाव्याचे सादरीकरण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : ५१३ कलाकार आणि ३०पेक्षा अधिक पारंपरिक व आधुनिक कला प्रकारांचा समावेश असलेल्या ‘सीता चरित्रम’ या महाकाव्याच्या सादरीकरणाने मुंबईकरांना मंत्रमुग्ध केले. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमधील ग्रँड थिएटरमध्ये सादरीकरण झालेल्या या महाकाव्यामुळे रसिकांना रामायणाच्या एका वेगळ्याच विश्वात नेले.
मुंबईत प्रसिद्ध निर्देशिका श्रीविद्या वर्चस्वी यांच्या संकल्पनेतून आणि दिग्दर्शनात साकारले गेलेले ‘सीता चरित्रम’ हे रामायणमधील सीतेची वेगळी बाजू उलगडते. ७,५०० वर्षांपासून मानवजातीसाठी समर्पित राहिलेल्या रामायण या महाकाव्याची भावनिक आणि काव्यात्मक मांडणी या कलाकृतीद्वारे करण्यात आली. अभिनेत्री हिना खान हिने सांगीतले, की ह्या महाकाव्याचा अनुभव पूर्णपणे अविस्मरणीय होता.
यामध्ये पारंपरिक नृत्य, लोककला, बाहुली कला, मूळ संगीत आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा सुरेख संगम होता. यामध्ये सीतेच्या आयुष्यातील प्रेम, त्याग, करुणा, शहाणपण आणि समर्पण अशा अनेक पैलूंना अत्यंत भावपूर्णपणे सादर केले गेले. मुंबईतील महाकाव्यात धारावी येथील आर्ट ऑफ लिव्हिंग स्कूलच्या ५० हून अधिक मुलांचा सहभाग होता. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे, अभिनेत्री अदा खान, गायिका अनुराधा पौडवाल, अभिनेते पंकज बेरी आणि दिलीप ताहिल हे या वेळी उपस्थित होते.
...........
मुंबईची प्रतिक्रिया अत्यंत भावुक आणि प्रेरणादायी होती. सीतेसारख्या कहाण्या जेव्हा प्रामाणिकपणे आणि अंतःकरणातून सांगितल्या जातात, तेव्हा त्या नक्कीच प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवतात.
श्रीविद्या वर्चस्वी, निर्देशक
............................
‘मला इथे येऊन फार आनंद झाला. श्रीविद्याजी यांनी अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि या संपूर्ण प्रयोगाची संकल्पना मांडणारी म्हणून अतिशय सुंदर कामगिरी केली आहे.’
- विक्रांत मैसी, अभिनेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com