‘आपली चिकित्सा’घराजवळ

‘आपली चिकित्सा’घराजवळ

Published on

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : गरीब रुग्णांना कमी किमतीत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेने ‘आपली चिकित्सा’ योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत मुंबईकरांना त्यांच्या घराजवळच विविध रक्त चाचण्या करणे अधिक सोपे होणार आहे.
महापालिकेने २०१९ मध्ये आरोग्यसेवा बळकटीकरणासाठी विविध योजना राबवल्या होत्या. त्यात आपला दवाखाना, प्रसूतिगृहे आणि रुग्णालयांमध्ये आपली चिकित्सा योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत दररोज चार हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी केली जात होती. तसेच २७.५ कोटींच्या करारात २० लाखांहून अधिक मूलभूत आणि तीन लाखांहून अधिक प्रगत तपासण्या करण्यात आल्या, पण दीड वर्षांपूर्वी निर्धारित संख्येच्या चाचण्या पूर्ण झाल्यामुळे डिसेंबर २०२४ मध्ये ही योजना थांबवण्यात आली होती, पण पालिकेने पुन्हा ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नव्या निविदेमध्ये ८३ चाचण्या करण्याचे प्रस्तावित केले आहे.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़ः--------------------------------------------
कंत्राटदारासाठी नियमावली
- ‘लाइफ नीटी हेल्थ लिमिटेड’ या कंपनीला ‘आपली चिकित्सा’चे कंत्राट मिळाले आहे. पुढच्या ४५ दिवसांत ही सुविधा सुरू करण्याचा प्रयत्न पालिका आणि कंत्राटदार करणार आहे. यासाठीचे दरपत्रक काढण्यात आले आहे. कंत्राटदाराला त्याचे नियोजन द्यावे लागणार आहे.
- मूलभूत चाचण्या १०१ ऐवजी ६६ आणि प्रगत चाचण्यांसाठी ३९ ऐवजी १७ असे प्रमाण केले. नव्या निविदा प्रक्रियेत ठेकेदाराला चार वर्षांत १२० लाख चाचण्या करण्याचे बंधन आहे. सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत घेतलेल्या नमुन्यांचे अहवाल संध्याकाळी ८ वाजेपर्यंत देणे बंधनकारक आहे.
-----------------------------------------
चाचण्यांसाठीते नवीन दरपत्रक
मूलभूत चाचण्या ‘ए’साठी प्रती चाचणी १०० रुपये आणि मूलभूत चाचण्या ‘बी’ करता ९९ रुपये अंदाजित दर निश्चित केला आहे.  त्यानुसार अनुक्रमे प्रती चाचणी ९० आणि १२० रुपये एवढा दर आहे, तर प्रगत तथा विशेष चाचण्यांकरता प्रती चाचणीचा दर ३९८ एवढा दर अंदाजित होता, त्या तुलनेत ४९५ रुपये बोली लावली आहे, मात्र मूलभूत ‘ए’ चाचण्या वगळता उर्वरित दोन चाचण्यांमध्ये प्रती चाचणीकरिता दोन रुपये दर आहे. 
.............................
चाचण्यांच्या संख्येला कात्री
मागील टप्प्यात १३९ प्रकारच्या चाचण्या होत होत्या, मात्र नव्या योजनेत सुमारे ९० चाचण्या ठेवण्यात आल्या आहेत. डेंगी, मलेरिया, मधुमेह, थायरॉईड, यकृत कार्य तपासणी, लघवी तपासणी, एचआयव्ही, विटॅमिन डी आणि बी१२ चाचण्या उपलब्ध असतील, मात्र पॅप स्मीअर, आयर्न प्रोफाइल, कारबामाझेपिन यांसारख्या आवश्यक तपासण्या यादीतून वगळण्यात आले आहे.
..........
मुंबईसाठी एकच संस्था
गेल्या वेळेचा अनुभव घेता क्रस्ना डायग्नोस्टिकप्रमाणे चाचण्यांचे लक्ष्य पूर्ण झाल्यानंतर सेवा देण्यास नकार दिल्यास ही योजना काही काळासाठी बंद झाली होती. त्यामुळे महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये येणाऱ्या गरीब रुग्णांना योजनेपासून वंचित राहावे लागेल, अशा प्रकारची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे रक्त चाचण्यांसाठी मुंबईसाठी एकच संस्था नियुक्त करण्यात आली आहे.
.........
वार्षिक चाचण्यांची संख्या :
मूलभूत रक्त चाचण्या ए (संख्या ४३) : वार्षिक चाचण्यांची संख्या - १२ लाख
मूलभूत रक्त चाचण्या बी (संख्या २३) : वार्षिक चाचण्यांची संख्या - ३ लाख
विशेष तथा प्रगत रक्त चाचण्या (संख्या १७) : वार्षिक चाचण्यांची संख्या - २ लाख ७० हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com