राज्यात २४ तासांत ११ नवे कोरोना रुग्ण
राज्यात २४ तासांत ११ नवे कोरोना रुग्ण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : राज्यात मंगळवारी (ता. ८) कोविडचे ११ नवे रुग्ण आढळले असून, दिवसभरात कोणत्याही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत राज्यात एकूण ३४,१०७ चाचण्या करण्यात आल्या असून, त्यातून २,५९४ रुग्ण बाधित आढळले आहेत. यापैकी २,४९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, सध्या ५५ रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यातील एकूण बरे होण्याचे प्रमाण ९६.२९ टक्के इतके आहे.
२४ तासांत आढळलेल्या ११ नव्या रुग्णांमध्ये मुंबईत सहा, ठाणे महापालिका क्षेत्रात दोन, पुणे महापालिका एक, कोल्हापूर एक आणि सांगली एक रुग्णाचा समावेश आहे. जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात ४१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, यामध्ये ४० रुग्ण गंभीर सहव्याधींनी ग्रस्त होते, तर एका रुग्णाचा मृत्यू इतर कारणाने झाला होता.
मुंबईत आतापर्यंत एकूण १,०२३ रुग्णांची नोंद झाली असून, जानेवारीत एक, फेब्रुवारीत एक, मार्चमध्ये शून्य, एप्रिलमध्ये चार, मे महिन्यात ४३५, जूनमध्ये ५५१ आणि जुलै महिन्यात आजअखेर ३१ रुग्ण आढळले आहेत. सर्व निदान झालेले रुग्ण सौम्य स्वरूपाचे असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.