बेस्टमध्ये संपाची चाहूल!
बेस्टमध्ये संपाची चाहूल!
समान काम, समान वेतनसाठी १,५२६ कामगारांचे मतदान
मुंबई, ता. ८ : खासगी कंपन्यांमार्फत चालविण्यात येणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांवर कार्यरत असणाऱ्या कामगारांना ‘समान कामाला समान दाम’ मिळावा, या मागणीसाठी संप करावा की नाही, यावर मंगळवारी (ता. ८) मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानात १,५२६ कामगारांनी सहभाग नोंदवत आपल्या भावना व्यक्त केल्या.
संघर्ष कामगार कर्मचारी युनियनमार्फत सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत देवनार, शिवाजीनगर, घाटकोपर, मुलुंड व मुंबई सेंट्रल या पाच आगारांमध्ये मतदान घेण्यात आले. संपाच्या या मागणीला बळ देण्यासाठी अन्य आगारांमध्येही मंगळवारी (ता. २२) मतदान घेण्यात येणार आहे. यानंतर संपाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे संघर्ष कामगार कर्मचारी युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी सांगितले. या मतदानातून पुढील काळात बेस्टमध्ये संपाचा वणवा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आगारातील मतदानाचा तपशील
देवनार आगार : २०९ कामगार
शिवाजीनगर आगार : २९६ कामगार
घाटकोपर आगार : २५८ कामगार
मुलुंड आगार : ४६१ कामगार
मुंबई सेंट्रल आगार : ३१४ कामगार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.