सायबर फसवणुकीतील दोन कोटी चीनमध्ये
सायबर फसवणुकीतील
दोन कोटी चीनमध्ये
गुन्ह्यातील सहा जणांना बेड्या
मुंबई, ता. १० : ओळख बदलून कंपन्यांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक करणाऱ्या नव्या सायबर गुन्हे प्रकारात सहभागी सहा आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
प्राथमिक चौकशीतून संबंधित गुन्ह्यातील म्होरके किंवा मुख्य सायबर भामटे चीनचे नागरिक आहेत. त्यांनी अटक केलेल्या आरोपींच्या मार्फत (भारतीय नागरिक) फसवणुकीतील रक्कम आभासी, परकीय चलनात रूपांतरित करून स्वीकारल्याची माहिती स्पष्ट झाल्याचा दावा पोलिसांनी केला.
एका अग्रगण्य कंपनीतील कर्मचाऱ्याला कंपनीचा संचालक असल्याचे भासवून दोन कोटी रुपये विविध बँक खात्यांवर वळते करण्याचे आदेश प्राप्त झाले. ज्या मोबाईल क्रमांकावरून हे आदेश प्राप्त झाले त्या क्रमांकाच्या व्हॉट्सॲप डीपीवर संचालकाचे छायाचित्र होते.
तेवढ्यावरून हे आदेश खरेच संचालकांनी दिल्याचा समज करून घेत कर्मचाऱ्याने दोन कोटी रुपये विविध बँक खात्यांवर वळते केले. पुढे खऱ्या संचालकाने आपण असे कोणतेही आदेश दिले नव्हते व संबंधित मोबाईल क्रमांक आपला नाही, असे स्पष्ट करताच हे प्रकरण तपासासाठी सायबर पोलिसांकडे दाखल झाले.
सायबर पोलिसांनी (पश्चिम विभाग) तांत्रिक विश्लेषणातून मुंबईसह पुणे, नाशिक आणि गोव्यातून शुभम कुंजीर, अक्षय शेळके, उज्ज्वलकुमार सिंह, शुभमकुमार सिंह, आदित्य शिंदे ऊर्फ ल्युसिफर आणि आर्यन मिश्रा या सहा तरुणांना अटक केली.
तपासादरम्यान गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली बँक खाती पुणे, नाशिकमध्ये राहणाऱ्या कुंजीर, अक्षय आणि उज्ज्वल यांची आहेत. गुन्हा घडला तेव्हा हे तिघे मुंबईतील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. शुभमकुमार याने त्यांची निवासव्यवस्था केली होती, तर चीनमध्ये बसलेल्या मुख्य भामट्यांना आदित्यने गोव्याला राहणाऱ्या आर्यनकरवी तिघांच्या बँक खात्यांचे तपशील पाठवले. आर्यनने या खात्यांवर आलेली रक्कम आभासी चलनात आणि परकीय चलनात रूपांतरित करून ती चिनी म्होरक्यांना पाठवली, अशी माहिती उघड झाली.
शस्त्रसाठा हस्तगत
या कारवाईदरम्यान २८ मोबाईल, १३ चेकबुक, विविध कंपन्यांची १६ सिम कार्ड, आठ डेबिट कार्डसह एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. शस्त्रांबाबत सायबर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.