२५० कोटींच्या एमडीप्रकरणी आरोपींचे प्रत्यार्पण 
प्रमुख आरोपींचे प्रत्यार्पण

२५० कोटींच्या एमडीप्रकरणी आरोपींचे प्रत्यार्पण प्रमुख आरोपींचे प्रत्यार्पण

Published on

२५० कोटींच्या एमडीप्रकरणी आरोपींचे प्रत्यार्पण

दुबईतून आणले मुंबईत; सीबीआय, गुन्हे शाखेचा पाठपुरावा

मुंबई, ता. ११ : सांगलीच्या इरळी गावात कारखान्यात २५२ कोटींच्या अमली पदार्थाचे उत्पादन घेणाऱ्या टोळीतील प्रमुख आरोपी मुस्तफा मोहम्मद कुब्बावाला याच्या मुसक्या आवळण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे. गुन्हे शाखा, केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पाठपुराव्यानंतर शुक्रवारी (ता. ११) संयुक्त अरब अमिरातीच्या दुबईतून त्याचे प्रत्यार्पण करण्यात आले. त्याच्याविरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.

गेल्या वर्षी मार्चमध्ये गुन्हे शाखेच्या घाटकोपर कक्षाने कुर्ला परिसरात एमडी या घातक अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या परवीन बानो या महिलेस अटक केली होती. तिच्याकडून ६४१ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले होते. या प्रकरणाच्या तपासात सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावातील एमडी उत्पादन कारखाना उघडकीस आला. गुन्हे शाखेने परवीनसह एकूण १३ आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यात एमडीचे उत्पादन घेणारे, तयार अमली पदार्थाची वाहतूक, विक्री करणाऱ्यांची महाराष्ट्र, गुजरातमधून धरपकड करण्यात आली होती.

तपासात ताहीर आणि मुस्तफा हे या टोळीचे म्हारके दुबईत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक आत्माजी सावंत आणि पथकाला मिळाली. या माहितीची खातरजमा करून परराष्ट्र सीबीआयच्या सहकार्याने या दोघांविरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली. अबुधाबीच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ताहीर यास अटक केली आणि गुन्हे शाखा आणि सीबीआयच्या पाठपुराव्याला गेल्या महिन्यात पहिले यश आले. काही दिवसांत मुस्तफाही त्यांच्या हाती लागला. त्यानुसार गुन्हे शाखेचे विशेष पथक दुबई येथे गेले. तेथील प्रत्यार्पण प्रक्रिया पूर्ण करून मुस्ताफाला शुक्रवारी मुंबईत आणण्यात आले. मुस्तफा याने कारखान्यासाठी अर्थसहाय्य दिले होते. या अटकेमुळे त्यांच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती हाती लागू शकते, अशी प्रतिक्रिया गुन्हे शाखेचे उपआयुक्त राज तिलक रोशन यांनी दिली.
------

कारखान्याच्या छाप्यातील घबाड
- १२६.१४१ किलो एमडी (मेफेड्रॉन)
- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मूल्य २५२ कोटी २८ लाख
- ३.६४ कोटी रुपयांची रोकड
- २५.०७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने
- स्कोडा कार, दुचाकी आणि अमली पदार्थांचा कच्चा माल आणि यंत्रसामग्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com