मच्छीमार आता नागरिक शास्त्रज्ञ!
मच्छीमार आता नागरिक शास्त्रज्ञ!
सागरी जीवांच्या मदतीसाठी ‘जलचर’ अॅप
मुंबई, ता. १२ : मासेमारीदरम्यान मच्छीमारांच्या जाळ्यात अडकलेल्या, जखमी किंवा संकटात सापडलेल्या सागरी जीव आणि पक्ष्यांसाठी मदत मिळवण्याचा मार्ग सोपा होणार आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएसएस)ने ‘जलचर’ हे नावीन्यपूर्ण मोबाईल अॅप विकसित केले आहे. यामुळे किनारी भागांतील मच्छीमार नागरिक शास्त्रज्ञ म्हणून सागरी जैवविविधतेच्या संवर्धनात सहभागी घेऊ शकणार आहेत.
‘जलचर’ अॅप भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रजातींचे वितरण, स्थलांतर मार्ग आणि अधिवास संरचनेबाबत माहिती गोळा करीत असून, ही माहिती वैज्ञानिकांना धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मदत करते. अॅपच्या माध्यमातून मच्छीमार थेट आपल्या मोबाईलवरून सागरी दृश्ये, प्रजातींची ओळख, छायाचित्रे, वेळ, ठिकाण आणि स्थिती नोंदवू शकतात. अॅपचा इंटरफेस सोपा असून साक्षरतेची अडचण न येता वापरता येतो.
या उपक्रमामुळे मच्छीमार आणि संशोधक यांच्यात सहकार्य वाढून सागरी जैवविविधतेबाबत जागरूकता निर्माण होते. संकटात असलेल्या, जखमी किंवा दुर्मिळ प्रजातींचे तत्काळ निदान आणि संरक्षण शक्य होणार आहे. या उपक्रमामुळे सागरी परिसंस्थेच्या आरोग्याचा मागोवा घेणे आणि संवर्धन धोरणे आखणे अधिक प्रभावी होईल, असे बीएनएचएसचे संचालक किशोर रिठे यांनी सांगितले.
----
वैशिष्ट्ये काय?
- सुलभ आणि दृश्य इंटरफेस
- थेट फोटो अपलोड, स्थान, वेळ, प्रजाती ओळख व अहवाल सादर करता येणार
- कमी शिकलेल्या वापरकर्त्यांसाठीही उपयुक्त
- रिअल-टाइम डेटा संकलन
-----
जलचर अॅप कसे मदत करते?
- संकटात असलेल्या जीवांची त्वरित माहिती
- प्रजातींचा डेटा संकलित
- दुर्मिळ जीवांचे संवर्धन
- मच्छीमार आणि संशोधक यांचा संवाद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.