रिक्षाचालकाचे दोन तरुणींशी गैरवर्तन
रिक्षाचालकाचे दोन तरुणींशी गैरवर्तन
घोडा मीटरबाबत विचारताच उतरवले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : रिक्षातून प्रवास करणाऱ्या दोन तरुणींना शनिवारी (ता. १२) पहाटेच्या सुमारास चालकाच्या उद्धटपणाला सामोरे जावे लागले. या तरुणी वांद्रे जिमखाना येथून मालाड पश्चिमेला जात होत्या. प्रवासादरम्यान रिक्षाचे मीटर जलद चालत असल्याबाबत त्यांनी विचारणा करताच चालकाने उद्धट उत्तरे देत त्यांना रस्त्यात उतरवले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता ती घेण्यास नकार दिल्याचा या तरुणींचा आरोप आहे.
एका तरुणीने सांगितले की, शनिवारी पहाटे मी आणि माझ्या मैत्रिणीने वांद्रे जिमखान्याच्या बाहेरून मालाड पश्चिमेला जाण्यासाठी रिक्षा पकडली. रिक्षाचे मीटर सामान्य मीटरपेक्षा जलद होते. आम्ही याविषयी चालकाला विचारले तेव्हा त्याने रात्रीच्या शुल्कामुळे असल्याचे सांगितले. आम्ही मदतीसाठी १०० नंबरवर फोन केला असता ऑपरेटरने आम्हाला जवळच्या पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले. आम्ही त्याला अर्धे पैसे देऊ केले असता त्याने ते पैसे आमच्या अंगावर भिरकावले, असे या तरुणींनी सांगितले.
त्यानंतर आम्ही या प्रकाराची तक्रार करण्यासाठी वनराई पोलिस ठाण्यात गेलो असता तेथील पोलिसांनी आमची थट्टा करून हा विषय आरटीओचा असल्याचे सांगून तक्रार घेण्यास नकार दिला. तसेच चालकाच्या वर्तनाबद्दल सांगितले असता त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. घडलेल्या प्रकाराबद्दल पीडित तरुणींनी नाराजी व्यक्त करीत पाेलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तरुणींशी संपर्क साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यानंतर नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
गिरीश बने,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वनराई पोलिस ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.