गुटखाविरोधी कारवाईत मुंबईची पीछाडी

गुटखाविरोधी कारवाईत मुंबईची पीछाडी

Published on

गुटखाविरोधी कारवाईत मुंबईची पिछाडी
१४ महिन्यांत केवळ १३ छापे; नऊ गुन्हे दाखल
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : राज्यात गुटखाविक्रीस बंदी असताना बाजारात गुटख्याची सर्रास विक्री सुरू आहे. असे असताना अन्न व औषध प्रशासनचा मुंबई विभाग मात्र कारवाईत पिछाडीवर आहे. मागील १४ महिन्यांमध्ये मुंबईत केवळ १३ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. त्यापैकी फक्त नऊ गुन्हे दाखल करण्यात आले.
राज्य सरकारने १९ जुलै २०१२ रोजी गुटखा आणि पानमसाल्याचे उत्पादन, खरेदी आणि विक्रीवर बंदी घातली आहे; तरीदेखील राज्यात सर्वत्र कधी गुप्तपणे, तर कधी उघडपणे विक्री केली जाते. बंदी असूनही राज्यात दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या गुटख्याची विक्री केली जाते. एफडीएने एप्रिल २०२४ ते मे २०२५ दरम्यान केलेल्या कारवाईत नागपूरमध्ये १२३, छत्रपती संभाजीनगरमध्ये ९४, अमरावतीत ७४, ठाण्यात ३० गुन्हे नोंदवले; मात्र राज्याच्या राजधानीचे शहर असलेल्या मुंबईत केवळ नऊच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
---
१५ लाखांचा मुद्देमाल जप्त
एफडीएने दिलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२४ ते मे २०२५ दरम्यान राज्यातील सात विभागांमध्ये ६६.४४ कोटींचा गुटखा आणि पानमसाला जप्त केला. त्यात सर्वाधिक ४५.६५ कोटींचा मुद्देमाल छत्रपती संभाजीनगरमध्ये पकडण्यात आला आहे. त्याचवेळी मुंबईत मात्र १५.१७ लाखांचाच साठा जप्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com