मुंबईवर धुलीकणांचे वादळ

मुंबईवर धुलीकणांचे वादळ

Published on

मुंबईवर धुलीकणांचे वादळ
महापालिकेच्या निष्क्रियतेने आरोग्य धोक्यात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : शहरात वायू प्रदूषणाबाबतच्या एका अहवालानुसार जानेवारी ते जूनदरम्यान धुलीकणांमुळे प्रदूषणाची सरासरी पातळी राष्ट्रीय मानकांपेक्षा खाली असल्याचे म्हटले आहे. पण मुंबईतील देवनार, सायन, कांदिवली पूर्व तसेच बीकेसी परिसरात ही पातळी धोकादायक मर्यादेपेक्षा जास्त नोंदवली गेली आहे. त्यामुळे मुंबईवरील धुळीचे वादळ आरोग्यासाठी घातक ठरण्याची शक्यता आहे.
‘सेंट्रल फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर’ (सीआरईए) संस्थेने मुंबईतील वायू प्रदूषणाबाबतच अर्धवार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात देवनार परिसरात प्रदूषणाची पातळी ४० घनमीटर इतकी होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या पाच घनमीटर या सुरक्षित मर्यादेपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. अशीच परिस्थिती सायन, कांदिवली आणि बीकेसीमध्ये दिसली. इतर समुद्रकिनाऱ्यांवर असणाऱ्या शहरांशी तुलना केली असता, मुंबईची हवा अधिक प्रदूषित असल्याचे स्पष्ट झाले.
------------------------------
पालिकेच्या नियमावलीची पायमल्ली
धूळ नियंत्रणासाठी प्लॅस्टिक शीट्सचा वापर, झाकण असलेली वाहने आणि पाण्याचा फवारा मारणे, अशा प्रकारची नियमावली पालिकेने केली आहे. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने मुंबईतील वाय प्रदूषणाची पातळी वाढली आहे. यामागे बांधकाम व्यावसायिकांकडून मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन मुख्य कारण असले तरी पालिकेच्या निष्क्रीय अंमलबजावणी व्यवस्थेचे हे अपयश असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-------------------------------------------
विविध आजार बळावले
आरोग्यतज्ज्ञांनी श्वसन, हृदयविकार आणि फुप्फुसविकारांची वाढ झाल्याचे निदर्शनास आणले आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी पालिका आयुक्तांकडे सहाय्यक आयुक्तांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाईची मागणी वातावरण फाउंडेशनचे प्रमुख भगवान केसभट यांनी केली आहे. महापालिकेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी रवि राजा यांनी केली.
........
मुंबईसारख्या शहरात हवेमुळे श्वास घेणेही धोकादायक झाले असेल, तर हे महापालिकेचे अपयश आहे. प्रदूषण वाढीसाठी कारणीभूत असणाऱ्या अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिकांवर कठोर कारवाई करावी.
- रवि राजा, उपाध्यक्ष, मुंबई भाजप
.........
प्रदूषणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे दिसते. प्रदूषण नियंत्रण नियमावलीची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे.
- भगवान केसभट, प्रमुख, वातावरण फाउंडेशन
............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com