‘ति’च्या शरीरातील ‘त्या’ची घुसमट
‘ति’च्या शरीरातील ‘त्या’ची घुसमट
२१ वर्षीय मुलीवर लिंग बदलाची यशस्वी शस्त्रक्रिया
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुलांसारखे राहणीमान, वागणूक आणि समाजातील अनेकांचे टोमणे, अशी काहीशी खडतर वाटचाल सहन करत अक्कलकोटच्या एका छोट्या गावातील प्रज्वल गालबोटेने (नाव बदलले आहे) लिंग बदलाची शस्त्रक्रिया केली आहे. सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या प्लॅस्टिक सर्जरी विभागाच्या डॉक्टरांनी यासाठी सर्वतोपरी सहकार्य करून वेगळी ओळख तसेच नवजीवन दिले.
वयाच्या सातव्या वर्षीच प्रज्वलला मुलगा असल्याची जाणीव झाली होती. चौदाव्या वर्षांपासून हार्मोन्स उपचार, त्यानंतर सर्जरींच्या टप्प्यांमधून जात अखेर जुलै २०२५ मध्ये त्याच्यावर पूर्ण लिंग बदल शस्त्रक्रिया पार पाडली. याबाबत प्रज्वल म्हणाला, हा प्रवास अतिशय घडतर होता. शाळा, महाविद्यालयात मुलींचे कपडे घालणे अनिवार्य होते, पण मी लहान होतो. महाविद्यालयात शिकताना मुलांचे कपडे घालायचो. वडील सुरुवातीला विरोध करत होते, पण आई ठाम होती. आतापर्यंत तीन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. आता मला बरे वाटत आहे. मुलीचे शरीर मला कधीच नको होते. माझ्या पप्पांनाही मी विश्वासात घेतले आणि त्यांनीही नंतर मला पाठिंबा दिला. या संपूर्ण प्रक्रियेतून बाहेर पडल्यावर त्याला स्वत:चे प्रोफेशनल मेन्स पार्लर सुरू करायचे आहे.
-----------------------------------
जगण्याची नवी दिशा
या संपूर्ण प्रक्रियेत डॉक्टरांएवढाच त्याच्या कुटुंबाचा त्याला पाठिंबा लाभला. प्रज्वलसारख्याच अशा अनेकांना त्याच्या खडतर प्रवासातून मनमोकळे जगण्याची दिशा मिळेल, अशी आशा जागतिक प्लॅस्टिक सर्जरी दिनानिमित्त सेंट जॉर्ज रुग्णालयाचे युनिटप्रमुख डॉ. सागर गुंडेवार यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.
.....
एकूण पाच वर्षे उपचार-
२०२० मध्ये हार्मोन्स उपचार
२०२१ मध्ये स्तन काढून टाकण्याची शस्त्रक्रिया
२०२३ मध्ये हिस्टेरेक्टॉमी
२०२५ मध्ये लिंग बदल शस्त्रक्रिया
....
आपल्याकडे वेगवेगळ्या शस्त्रक्रिया खूप कमी खर्चात होतात. या सुविधांचा जास्तीत जास्त फायदा लोकांनी घ्यावा. या शस्त्रक्रिया आव्हानात्मक असतात, पण आपल्याकडे सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
- डॉ. सागर गुंडेवार, प्लॅस्टिक सर्जरी विभाग, युनिटप्रमुख, सेंट जॉर्ज रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.