आयआयटीतील संशोधकांकडून नवीन सौर सेल तंत्रज्ञान विकसित

आयआयटीतील संशोधकांकडून नवीन सौर सेल तंत्रज्ञान विकसित

Published on

आयआयटीतील संशोधकांकडून नवीन सौर सेल तंत्रज्ञान विकसित
अत्यंत कमी खर्चाच सौर सेलची कार्यक्षमता ३० टक्क्यांहून वाढणार

मुंबई, ता. १५ : आयआयटी मुंबईतील संशोधकांनी एक अत्याधुनिक सौर सेल तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामुळे विजेचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत मिळणार आहे. यासोबतच सध्या असलेल्या या तंत्रज्ञानातील कार्यक्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास मदत होणार असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. हे नवीन संशोधन फोर-टर्मिनल टँडेम सोलर सेल या तंत्रज्ञानावर आधारित असून, यात पारंपरिक सिलिकॉन सेल्स आणि आयआयटीने देशांतर्गत विकसित केलेले हॅलाइड पेरोव्स्काइट लेयर एकत्रित करून ते संकरित करण्यात आले आहे.

आयआयटी मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर फोटोवोल्टॅक रिसर्च अँड एज्युकेशन (एनसीपीआरई) मधील आयआयटी मुंबईतील प्रा. दिनेश कब्रा यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी हे अत्याधुनिक सौर सेल तंत्रज्ञान विकसित केले आहे. या नवीन तंत्रज्ञानाने अंदाजे ३० टक्के कार्यक्षमता वाढण्यास मदत मिळणार आहे, तर पारंपरिक सिलिकॉन सौर सेल्सच्या तुलनेत ही कार्यक्षमता सुमारे २० टक्के इतकी असते. जर हे मोठ्या प्रमाणात स्वीकारले गेले तर सौर विजेचा खर्च अडीच ते चार रुपये प्रति युनिटऐवजी रुपये एक प्रति युनिट इतका कमी होईल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. दरम्यान, या नवीन संशोधनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. १५) केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आयआयटीतील एनसीपीआरईच्या संशोधक आणि सल्लागार मंडळाचे सदस्य यांच्याबरोबर संवाद साधला. तसेच आयआयटी मुंबईतील एनसीपीआरईला २०० कोटींहून अधिक निधी जाहीर केला. नव्या तंत्रज्ञानामुळे सौर सेल १० वर्षांपर्यंत कार्यरत राहू शकतील. विशेष म्हणजे हे सौर सेल तयार करण्यासाठी लागणारे साहित्य देशातच उपलब्ध होणार आहेत.

‘महाजेनको’कडून परीक्षण
राज्य सरकारच्या वीजनिर्मिती कंपनी महाजेनकोने या नव्या पॅनेल्सचे पायलट प्रकल्पांसाठी परीक्षण करण्याचे ठरवले आहे. हे सुधारित सौर सेल फक्त पारंपरिक वीजनिर्मितीसाठीच नाही तर छतावरील स्थापन, सौर वाहने आणि इमारतींमध्ये एकत्रित प्रणालींसाठीदेखील वापरले जाऊ शकतात. उच्च दाबाच्या क्षमतेमुळे ते हरित हायड्रोजन निर्मितीसाठीदेखील उपयुक्त ठरणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com