मुंबईत १२६ शाळांवर 
फौजदारी गुन्हे दाखल

मुंबईत १२६ शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल

Published on

मुंबईत १२६ शाळांवर
फौजदारी गुन्हे दाखल

४७ शाळा बंद; तर १०३वर दंडात्मक कारवाई

मुंबई, ता. १६ : शहरात शालेय शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी न घेता तब्बल ४२० बेकायदा शाळा सुरू आहेत. यापैकी १२६ शाळा आणि संबंधित व्यवस्थापनांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर १०३ शाळांवर दंडात्मक कारवाई आणि एकूण ४७ शाळा बंद करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.

विधानसभेत विधानसभा सदस्य भास्कर जाधव, मनोज जामसूतकर आदींनी राज्यात बेकायदा शाळा सुरू असल्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी बेकायदा शाळांत शिक्षण घेत असलेल्या ३९ हजार ८९१ विद्यार्थ्यांच्या आणि एक हजार ६६६ शिक्षकांच्या भवितव्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील लेखी उत्तरात शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी मुंबई विभागातील एकूण ४२० बेकायदा शाळांपैकी १०३ शाळांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. १२६ शाळांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. तसेच ४७ शाळा बंद करण्यात आल्या असल्याची माहिती दिली.
---
विद्यार्थ्यांच्या समायोजनाच्या सूचना
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात १,०५७ खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांपैकी २१८ शाळांनी नमुना-२ची पुनर्मान्यता, पुनर्मान्यतेचे नूतनीकरण २०२२ या वर्षात केलेले नव्हते. सध्या २११ शाळांना आरटीईची मान्यता असून, सात शाळा बंद झाल्या आहेत. तसेच ८५ बेकायदा शाळांबाबतचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तांना मिळाला आहे. तो शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती भुसे यांनी दिली. बंद केलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांचे समायोजन स्थानिक स्तरावर जवळच्या शाळांमध्ये करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देलेल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com