नात्यात अडसर ठरणाऱ्या सावत्र मुलीची हत्या
नात्यात अडसर ठरणाऱ्या
सावत्र मुलीची हत्या
मृतदेह सापडताच पसार तरुणास अटक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ ः वैवाहिक आयुष्यात अडसर ठरणाऱ्या चार वर्षांच्या सावत्र मुलीची हत्या केल्याच्या आरोपात अँटॉप हिल पोलिसांनी इमरान शेख (वय ३४) या तरुणास अटक केली. ससून डॉकजवळील समुद्रात सोमवारी सकाळी या बालिकेचा मृतदेह सापडल्यानंतर इम्रान अँटॉप हिल परिसरातील राहत्या घरातून पसार झाला होता. लोअर परळ येथून मंगळवारी आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने कबुली देताच त्यास अटक करण्यात आल्याची माहिती परिमंडळ-४च्या उपायुक्त आर. रागसुधा यांनी दिली.
आमिरा असे मृत बालिकेचे नाव असून, ती आई नाझिया आणि इम्रानसोबत अँटॉप हिल येथील राजीव गांधी नगरात वास्तव्यास होती. दोन व्यक्तींसोबत घटस्फोट झाल्यानंतर नाझियाने अलीकडेच इम्रानसोबत लग्न केले होते; मात्र या वैवाहिक आयुष्यात नाझियाला आधीच्या पतीपासून झालेली आमिरा अडसर ठरते, असा इम्रानचा समज होता. आमिरा वेळोवेळी खऱ्या वडिलांची आठवण काढायची, त्यांच्याशी फोनवर बोलायची, त्यांना भेटण्यासाठी हट्ट करायची. त्यामुळे इम्रान अस्वस्थ होता. बाहेर फिरवून आणण्याच्या बहाण्याने सोमवारी रात्री आठच्या सुमारास त्याने आमिराला भाऊचा धक्का येथे नेले आणि गळा आवळून हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह समुद्रात फेकून दिला.
दरम्यान, आमिरा दिसत नसल्याने नाझिया तिचा शोध घेत होती. इम्रानही घरी परतल्यावर तोही तिच्यासोबत शोधकार्यात सहभागी झाला. मुलगी बेपत्ता झाल्याबाबत त्यांनी मध्यरात्री पोलिस ठाण्यात तक्रार दिली; मात्र मंगळवारी सकाळी एका मच्छीमाराला आमिराचा मृतदेह ससून डॉकजवळील समुद्रात सापडला.
---
१६२ सीसीटीव्हींद्वारे शोध
आमिराचा मृतदेह सापडल्यानंतर इम्रान फरार झाला होता. अँटॉप हिल पोलिसांनी परिसरातील १६२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण पडताळून बेपत्ता होण्यापूर्वी आमिरा इम्रानसोबत असल्याची माहिती मिळवली. तांत्रिक तपासातून सतत ठावठिकाणा बदलणाऱ्या इम्रानला पोलिसांनी लोअर परळ भागातून ताब्यात घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.