पॉलिटेक्निकच्या प्रवेशाकडे वाढता कल
पॉलिटेक्निकच्या प्रवेशाकडे वाढता कल
पहिल्या फेरीत ४८,८३५ प्रवेश; आजपासून दुसऱ्या फेरीचे पसंतीक्रम
मुंबई, ता. १६ : तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत येणाऱ्या राज्यातील दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक)च्या प्रवेशाच्या पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रियेत मागील वर्षांच्या तुलनेत विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मागील वर्षीच्या पहिल्या यादीत ३९ हजार ७३१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते, तर यंदा पहिल्या फेरीदरम्यान ४८ हजार ८३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
पॉलिटेक्निक प्रवेशाच्या पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी ७ जुलैला जाहीर झाली होती. या यादीतील ४८ हजार ८३५ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश पूर्ण केले असून आता दुसऱ्या फेरीची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी १६ जुलैला या प्रवेशासाठी रिक्त असलेल्या जागांची यादीही जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांना गुरुवारी (ता. १७) विविध महाविद्यालयातील पसंतीक्रम भरता येतील. यासाठी १९ जुलैपर्यंत मुदत असेल. त्यानंतर या फेरीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी २१ जुलैला जाहीर केली जाणार असल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहीतकर यांनी दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना २२ ते २४ जुलैदरम्यान संबंधित महाविद्यालयांत जाऊन आपले प्रवेश निश्चित करण्यासाठी कागदपत्रे सादर, शुल्क अदा करावे लागेल.
--
दोन प्रवेश फेऱ्यांतील तुलनात्मक सांख्यिकी
तपशील २०२५-२६ २०२४-२५ फरक
कॅप फेरीसाठी एकूण संस्था ४०४ ३९४ १०
एकूण प्रवेश क्षमता १,२०,२८६ १,१३,५८७ ६,६९९
अंतिम गुणवत्ता यादीतील अर्ज १,४०,२८६ १,२७,९६० १२,३२६
पसंतीक्रम नोंदवलेले विद्यार्थी १,१८,९९६ १,०६,०२८ १२,९६८
ॲलॉट झालेले एकूण विद्यार्थी ८१,८३० ७३,९८१ ७,८४९
एकूण प्रवेश झालेले विद्यार्थी ४८,८३५ ३९,७३१ ९,१०४ (सुधारित)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.