मुंबईकरांना जलदिलासा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ ः शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत ८० टक्के पेक्षाही जास्त पाणीसाठा आहे. त्यामुळे पुढील २८८ दिवस शहराला पाणीटंचाई भेडसावणार नसल्याची माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली आहे.
मुंबई शहराला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर, तर ठाणे, भिवंडी पालिकेला दररोज १८० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. त्यानुसार सध्या तलावांत उपलब्ध पाणीसाठ्यानुसार पुढील २८८ दिवस पुरेल इतका आहे. गेल्या काही दिवसांत तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. तसेच अजून अडीच महिन्यांचा पावसाचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे सातही तलाव भरले जाण्याची शक्यता असल्याने ही बाब मुंबईकरांसाठी दिलासा देणारी आहे.
----------------------------
सात तलावांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
तलाव पाणीसाठा टक्के
अप्पर वैतरणा १,७५,४९६ ७७.२९
मोडक सागर १,२८,९२५ १००.००
तानसा १,२९,३९३ ८९.१९
मध्य वैतरणा १,७८,१५६ ९२.०६
भातसा ५,३१,९०० ७४.१८
विहार १,४,४५२ ५२.१८
तुळशी ४,२४३ ५२.७३
--------------------------------------------------------
२०२५ १,१६,२,५६५ ८०.३२
२०२४ ५३,३,५२३ ३६.८६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.