जनरल फिजिशियनना समजेल खोकल्याचे खरे कारण
जनरल फिजिशियनना समजेल खोकल्याचे खरे कारण
कफ क्लिनिकद्वारे मुंबईसह देशभरातील डॉक्टरांना प्रशिक्षण
खोकल्याचे योग्य निदान झाल्यास आजार लवकर बरा होऊ शकतो
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : खोकल्याचे अनेक प्रकार आहेत, परंतु अनेकदा डॉक्टर खोकल्यामागील खरे कारण न शोधता फक्त लक्षणांवरच उपचार करतात. या उपचार पद्धतीच्या अभावामुळे जटिल आणि बहुघटक असलेल्या कफ सिरपचा वापर केला जातो. यामुळे दुष्परिणामांचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी कफ क्लिनिकने पुढाकार घेतला आहे.
कोविडनंतर खोकल्याचे रुग्ण सतत वाढत आहेत. भारतात सरासरी प्रौढ व्यक्तीला वर्षातून सुमारे तीन वेळा खोकला येतो, तर मुलांमध्ये ही संख्या सात ते १० पट असू शकते. हे सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक आहे. यावर सामान्यतः प्राथमिक स्तरावरील डॉक्टर उपचार करतात. जनरल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, खोकला आणि श्वसनाच्या समस्या इतक्या सामान्य असूनही सुमारे ७० टक्के लोकांना कोणत्याही ठोस तपासणीशिवाय केवळ लक्षणांवर आधारित उपचार मिळतात.
कफ क्लिनिकच्या मदतीने आता जनरल फिजिशियन खोकल्यामागील खरे कारण जाणून घेऊ शकतील आणि त्यावर मुळापासून उपचार होऊ शकतील. देशातील पहिले कफ क्लिनिक गुरुवारी (ता. १७) अंधेरी येथील एका खासगी रुग्णालयात सुरू झाले. पहिल्याच दिवशी क्लिनिकमध्ये ५० हून अधिक जनरल फिजिशियनना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
देशभरात १० कफ सेंटर्स ऑफ एक्सलन्स स्थापन करणार
आरोग्य कंपनी केनव्ह्यूने असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया (एपीआय)च्या सहकार्याने कफ क्लिनिकसाठी पुढाकार घेतला आहे. केनव्ह्यूचे वैद्यकीय प्रमुख डॉ. हर्षद मालवे म्हणाले, ‘देशभरात १० कफ सेंटर्स ऑफ एक्सलन्स स्थापन केली जातील. ही केंद्रे कफ क्लिनिक म्हणून चालवली जातील, ज्याचा उद्देश खोकल्याचे मूल्यांकन आणि उपचारांमध्ये वैज्ञानिक पद्धतींचा वापर व ज्ञान वाढवणे आणि पसरवणे आहे. मुंबईत लाँच झाल्यानंतर पुढील काही महिन्यांत लखनऊ, चंदीगड, हैदराबाद, बंगळुरू आणि कोलकातासारख्या प्रमुख शहरांमध्येही कफ क्लिनिक सुरू केली जातील.’
खोकल्याचे कारण जाणून घेण्यासाठी तीन मॉड्यूल
एपीआयचे मानद सरचिटणीस डॉ. अगम व्होरा म्हणाले, ‘कफ क्लिनिकमध्ये एकूण तीन अध्यापन मॉड्यूल असतील. प्रत्येक मॉड्यूल अशाप्रकारे डिझाइन केले आहे, की ते खोकला मूल्यांकन, आवाज ओळखणे, उपचार निर्णय आणि तर्कशुद्ध उपचार यासारख्या विशिष्ट पैलूंवर लक्ष केंद्रित करते. त्याची सामग्री एपीआयच्या तज्ज्ञांनी तयार केली आहे आणि प्रमाणित केली आहे. सर्व सत्रे आघाडीचे फुप्फुसरोगतज्ज्ञ आयोजित करतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.