अवयवदानाने दोघांना नवजीवन

अवयवदानाने दोघांना नवजीवन

Published on

चेंबूरमधील ५६ वर्षीय महिलेच्या कुटुंबाचा स्तुत्य निर्णय

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २०: चेंबूर येथील शुश्रुत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ५६ वर्षीय महिलेला मेंदू मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर, त्यांच्या कुटुंबीयांनी पुढाकार घेत अवयवदानाचा निर्णय घेतला. या महत्त्वाच्या निर्णयामुळे दोन रुग्णांना नवजीवन मिळाले आहे.

या महिलेकडून दोन्ही किडन्या दान करण्यात आल्या असून, त्या दोन वेगवेगळ्या रुग्णांना यशस्वीरित्या प्रत्यारोपित करण्यात आल्या. हे मेंदू मृत अवस्थेतील यंदाचे मुंबई विभागातील ३० वे अवयवदान ठरले आहे.

राज्यात सध्या अनेक रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत असून, दरवर्षी निकामी होणाऱ्या अवयवांमुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, मेंदू मृत व्यक्तीकडून होणाऱ्या अवयवदानांचे प्रमाण तुलनेत फारच कमी आहे. त्यामुळे अवयवदानाविषयी जनजागृती होणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

“मेंदू मृत अवस्थेतील व्यक्तीच्या अवयवांमुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे नागरिकांनी या विषयाकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा,” असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com