खड्ड्यांमुळे पालिकेवर रोष,
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : पालिकेच्या रस्ते विभागाने महानगरातील रस्त्यांची दुरुस्ती केली होती, पण दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने भरलेले खड्डे पुन्हा जैसे थे झाले असून, रेती, सिमेंट, खडी पसरल्याने अपघातांच्या शक्यतेने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
सायन, चुनाभट्टी, कुर्ला, दादर, भायखळा, चिंचपोकळी भागांमधील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे नागरिकांच्या तक्रारींचे केंद्रबिंदू ठरत आहेत. सतत पाऊस सुरू असल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. यामुळे अपघातांबरोबर वाहतूक कोंडीदेखील होत आहे. त्यामुळे मुंबईकरांकडून पालिकेकडे तक्रारींचा पाढा वाचला जात आहे. पालिकेच्या ‘पॉटहोल क्विकफिक्स’ या मोबाईल अॅप ३,४५१ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ३,२३७ ठिकाणी कारवाई झाल्याचा दावा पालिकेने केला आहे, तर ११४ तक्रारींची दुरुस्ती प्रक्रियेत आहे. याशिवाय इतर विभागांच्या ९३१ तक्रारीही अॅपवर नोंदवल्या गेल्या आहेत. त्यामुळे पावसामुळे पालिका कर्मचाऱ्यांवरील मुंबईकरांचा रोष खड्ड्यांमुळे अधिकच वाढला आहे.
------------------------------------------------------
प्रभागामध्ये पथक तैनात
या अॅपद्वारे नागरिक रस्त्यावरील खड्ड्यांचे छायाचित्र, स्थान व माहिती अपलोड करून तक्रार नोंदवू शकतात. तक्रार संबंधित विभागाला स्वयंचलित पद्धतीने पाठवली जाते आणि त्यावर वेळेत कारवाई करण्याचा दावा पालिकेचा आहे. ९ जूनपासून ही प्रमाणा कार्यान्वित झाली आहे. त्यानुसार पालिकेने प्रत्येक प्रभागामध्ये सहाय्यक अभियंत्यासह तिघांचे पथक तैनात केले आहे.
-------------------
पावसामुळे व्यत्यय
सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तक्रारींचा नवा पाढा सुरू झाला आहे. खड्डे भरले गेले तरी पावसामुळे ते पुन्हा उघडत असल्याने, या अॅपवर तक्रारी सतत वाढत आहेत. पावसाच्या उघडकीची वाट पाहत रस्ते विभाग पुन्हा नव्याने खड्डे भरायला सज्ज आहे. पाऊस थांबेपर्यंत खड्डे भरण्याचे काम प्रभावीपणे होणार नाही, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.
............
नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतुकीदरम्यान काळजी घ्यावी आणि खड्डे आढळल्यास अॅपवर तक्रार नोंदवावी. पावसाचा जोर ओसरल्यास तत्काळ खड्डे भरण्याचे आदेश पथकाला देण्यात आले आहे.
-गिरीश निकम, मुख्य अभियंता, रस्ते विभाग
............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.